OTW निवडणूकीत लढणे

OTW(परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) बोर्डाच्या निवडणूकीत लढण्याबद्दल आपल्या उत्साहासाठी धन्यवाद! लढण्याच्या पात्रतेविषयी अधिक माहितीसाठी, कृपया आमच्या या दूवेस भेट द्या उमेदवार बनणे पृष्ठ. उमेदवारी प्रक्रियेचा आढावा खालील प्रमाणे आहे.

उमेदवारी हंगाम घोषणा कालावधीच्या अंताला, निवडणूकीच्या आठ आठवडे आधी, प्रारंभित होतो आणि मतदानाच्या अंतापर्यंत विलंबित असतो. आम्ही उमेदवारांना OTW च्या सदस्यते बरोबर, त्यांच्या पसंतीच्या मंचावर, त्यांची व्यासपीठे, मते व विचारांबाबत चर्चा करण्यास प्रोत्साहित करतो.

उमेदवारांनी त्यांची तत्वे, मंडळा बाबतीची लक्ष्ये, आणि मंडळाच्या भवितव्याचे विचार याबद्दल सारांशित करणारे एक संक्षिप्त सार्वजनिक विधान करणे गरजेचे आहे. OTW निवडणूका वेबसाईटवर हे विधान उपलब्ध असेल.

हे विधान सादर केल्यानंतर, इतर लोकांना त्यांचे उमेदवारांसाठी असलेले प्रश्न प्रस्तुत करण्याची संधी मिळेल. उमेदवार या प्रश्नांची उत्तरे, विषयानुसार आयोजित केलेल्या सेट्स मध्ये, OTW निवडणूका वेबसाईटवर देतील.

उमेदवारांना नियोजित वेळेनुसार, OTW ने प्रदान केलेल्या मंचावर, सार्वजनिक चर्चेमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहित केले जाईल. चर्चेचा उतारा सुद्धा OTW निवडणूका वेबसाईटवर उपलब्ध केला जाईल.