OTW निवडणूका कशा कार्यरत होतात

OTW मतपत्रिका कार्यपद्धत

आमच्या बोर्डाच्या निवडणुकीसाठी, OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी), Instant Runoff Voting (झटपट रनऑफ मतदान) – IRF प्रणाली आधारित विविध प्रधान्य पर मतदान वापरत आहे. या पद्धतीमुळे एकल मतपत्रिका कार्यपद्धतीचा वापर होऊन, प्रत्येक मत मोजले जाते.

मते जशी जशी टाकली जातात, प्रत्येक मतदाराचे पहिले प्राधान्य मोजले जाते व त्या मतांच्या आधारे उमेदवारांची योग्य अनुक्रमाप्रमाणे यादी बनवली जाते. जेव्हा सर्व पहिले प्राधान्य मोजले जातात, तेव्हा जर एका उमेदवारास बहुमत मिळत असेल तर तो उमेदवार आमचा पहिला विजेता ठरतो. एकापेक्षा जास्त विजेत्यांसाठी IRV मध्ये बदल करण्याकरीता, आम्ही पहिल्या विजेत्याला मतपत्रिकेतून हटवितो. ज्या मतपत्रिका काढलेल्या उमेदवारास नियुक्त केल्या होत्या त्या परत मोजल्या जातात व त्या मतपत्रिकांवरील चिन्हांकित केलेले दुसरे प्राधान्य उर्वरित उमेदवारांपैकी एकास मतांची नेमणूक करण्यास वापरले जाते. पुन्हा एकदा उमेदवारांची योग्य अनुक्रमाप्रमाणे यादी बनवली जाते, व यादीमधील सर्वात वरचा उमेदवार दुसरा विजेता ठरतो.

क्रमाक्रमाने सूचनांसाठी, कृपया हे बघा मतदानाच्या सूचना.

IRV (झटपट रनऑफ मतदान) काय आहे?

झटपट रनऑफ मतदान ही निवडणूक प्रणाली आहे जी मतदानाच्या एका फेरीमध्ये मतदारांना त्यांच्या प्राधान्याचा क्रम विचारून निर्णय घेण्यास अनुमती देते. या पद्धतीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे टाय तोडण्यासाठी नवीन मतपत्रिकेचा वापर टळतो. IRV सामान्यतः डावपेचात्मक मतदानास न जुमानणारे असते — आपण प्रामाणिकपणे समर्थन करणाऱ्या उमेदवारास मत देण्या ऐवजी, जिंकावासा न वाटणाऱ्या उमेदवाराच्या विरोधात मत करणे — कारण ही पद्धत कोणालाही बिघडलेला उमेदवार होण्याची शक्यता कमी करते. मते वाया जात नाहीत, याचा अर्थ असा की मतदारांना विस्तृत श्रेणी चे पर्याय असतात. ही रँकिंग पद्धत नकारात्मक मोहीम व वेगळ्या उमेदवाच्या समर्थकांमध्ये संघर्ष कमी करू शकते — सरतेशेवटी एका उमेदवाराने दुसऱ्या उमेदवाराच्या समर्थकांना दूर करण्याची गरज नाही जेव्हा कोणताही मतदार एका वेळेस दोन लोकांना समर्थन करू शकतो!

OTW च्या मतपत्रिकेवर, मतदार जितके हवे तेवढे जास्त अथवा कमी उमेदवारांचे मानांकन करू शकतात, जोपर्यंत ते एका तरी उमेदवाराचे मानांकन करीत आहेत.

मते जशी जशी टाकली जातात, प्रत्येक मतदाराचे पहिले प्राधान्य मोजले जाते व त्या मतांच्या आधारे उमेदवारांची योग्य अनुक्रमाप्रमाणे यादी बनवली जाते. जेव्हा सर्व पहिले प्राधान्य मोजले जातात, तेव्हा जर एका उमेदवारास बहुमत मिळत असेल तर तो उमेदवार आमचा पहिला विजेता ठरतो. जर बहुमत होत नसेल तर ज्या उमेदवाराला सर्वात कमी पहिल्या प्राधान्याचे मानांकन मिळाले असेल त्याला काढले जाते. ज्या मतपत्रिका त्या काढलेल्या उमेदवारासाठी नेमलेल्या आहेत त्यांची परत मोजणी केली जाते व त्या मतपत्रिकेतील दुसऱ्या प्राधान्याची मानांकने शिल्लक असलेल्या वेगळ्या उमेदवारांना मते नेमणुकीस वापरली जातात. योग्य अनुक्रमाची यादी परत बनविली जाते, व जो पर्यंत बहुमत असलेला विजेता मिळत नाही तो पर्यंत ह्या प्रक्रियेची पुनरावृत्ती केली जाते.

एकूण मतदारांपैकी सर्वाधिक मतदारांना मान्य असेल अशा उमेदवाराची निवड करण्यास IRV मदत करते — नुस्ता तोच उमेदवार नाही ज्यास सर्वाधिक मते असतील, जी शक्यता मानांकनांचा वापर नसलेल्या मतपत्रिका वापरात असते जिथे एकापेक्षा जास्त उमेदवार आहेत.

प्रातिनिधीक मते

प्रतिनिधी द्वारे मत हा एक मार्ग आहे ज्या द्वारे निवडणुकीमध्ये तुम्ही तुमच्या ऐवजी इतर कोणाला मत टाकण्यास नेमू शकता.

OTW ला प्रातिनिधीक-मतदान करू देणे Delaware(डेलावेर) कायद्या प्रमाणे आवश्यक आहे, जो निर्दिष्ट करतो की: “भागधारक दूसऱ्या व्यक्ती किंवा व्यक्तींस त्या भागधारकाच्या वतीने प्रतिनिधित्व-धारक व्यक्तीस इलेक्ट्राॅनिक प्रसारणाचा अधिकार किंवा प्रसारित करण्यास अधिकार देऊ शकते.”

काॅर्पोरेट निवडणुकांमध्ये, प्रतिनिधी चा वापर तेव्हा केला जातो जेव्हा मतदार सदस्य स्वत: बैठकीमध्ये उपस्थित राहू शकत नाही. जेव्हा विस्तारित, इलेक्ट्रॉनिक मतदान, बहुत-करून नेहमीची कारणे प्रातिनिधीक मतदानास लागू होत नाहीत. परंतु, मतदाचा काळ अशा वेळेला असू शकतो जेव्हा मतदारास इतर वचनबद्धता असू शकते किंवा त्यांना इंटरनेट उपलब्ध नसू शकते.

जर तुम्हाला मतदान प्रतिनिधीची गरज असेल तर आपण त्यांची नेमणूक निवडणूकीच्या दोन आठवडे आधी पर्यंत करू शकता. प्रतिनिधीची नेमणूक सहा महिने टिकते, आणि ते सहा महिने पूर्ण होई पर्यंत, आम्ही प्रतिनीधीची नेमणूक बदलू किंवा काढू शकत नाही. प्रतिनिधी मतांची परत नेमणूक होऊ शकत नाही.

प्रतिनिधीची नेमणूक ईमेल द्वारे केली जाते. जेव्हा आपण मतदान प्रतिनिधीच्या नेमणूकीची विनंती पाठवता, ती विनंती त्याच ईमेल पत्त्यावरून उत्पन्न होऊदे ज्याचा वापर आपण यापूर्वी OTW साठी केला आहे, व [email protected] आणि आपल्या प्रतिनिधीच्या अशा दोन्ही पत्त्यांवर पाठवावी. ईमेल मध्ये आपले कायदेशीर नाव, व ईमेल प्रापतकर्त्याच्या प्रतिनिधी म्हणून नेमणूकीची घोषणा असणे आवश्यक आहे. आपल्या प्रतिनिधीने सर्व ईमेल प्राप्तकर्त्यांना, पोच पावतीची कबुली व त्यांचे कायदेशीर नाव यांसह प्रत्युत्तर देणे गरजेचे आहे. हे प्रत्युत्तर [email protected] यांना निवडणूकीच्या दोन आठवडे आधी प्राप्त होणे गरजेचे आहे.

प्रतिनिधीची निवडणूक करताना तुमच्या वतीने मत देण्यास विश्वासू व्यक्तीची निवड करा. सामान्यतः, आपण आपल्या व आपल्या प्रतिनिधीमध्ये आपणास ऐच्छिक अटी ठरवू शकता, पण त्या फक्त त्या दोन व्यक्तींपुरत्या असतात. आपण ठरविलेल्या अटींची अंमलबजावणी करण्यास OTW जवाबदार नसेल, व आम्ही आपल्या प्रतिनिधीने आपले मत वापरले असल्याची किंवा त्यांनी कोणास मत दिले आहे याची खात्री करू शकत नाही.

आव्हाने

फक्त उमेदवारच परत-मोजणीची किंवा नवीन मतांची मागणी करू शकतात. हे करण्यास इच्छुक उमेदवाराने त्यांची विनंती त्यांना परत मोजणी किंवा परत मतदान का होणे गरजेचे वाटते या बद्दलच्या स्पष्टीकरणासह आमच्या निवडणूक समितीस