OTW निवडणुकीत मतदान

OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) बोर्डाच्या सदस्यांना मतदान देण्यासाठी, निवडणुकीच्या वर्षाच्या ३० जून आधी आपण OTW चे संपूर्ण वेतनाचे सदस्य असणे आवश्यक आहे. कृपया लक्षात घ्या की आपली देणगीची पावती US पूर्व वेळेप्रमाणे असेल, म्हणून जर आपली देणगी वेळ पावतीवर ३० जून रोजी १९:५९ नंतर सूचीबद्ध केली गेली तर आपण मतदानास पात्र ठरणार नाही. आपली देणगी अंतिम मुदतीपूर्वी देण्यात आली आहे याबद्दल आपल्याला खात्री नसल्यास, कृपया आमच्या वेबसाइटवर संपर्क फॉर्म वेबसाईटचा आणि “Is my membership current/Am I eligible to vote?” (माझी सदस्यता वर्तमान/मी मतदान करण्यास पात्र आहे का?) निवडा. महत्वाच्या तारखांसाठी काळरेषा तपासा.

आपण आपल्या स्वतःचा चेक, क्रेडिट कार्ड किंवा आपले PayPal (पे-पॅल) खाते वापरुन देणगी देणे गरजेचे आहे. सभासदत्वाच्या कारणामुळे, आम्हाला आपले देयक आपल्या बँक खात्याशी किंवा क्रेडिट कार्डशी कनेक्ट करता येणे आवश्यक आहे, जेणेकरून आम्ही निवडणुका घेताना आपण खरोखर एक वास्तविक व्यक्ती आहात हे सत्यापित करू.

OTWमध्ये सामील व्हा आणि मतदान देण्याचे हक्क मिळवा!

एकदा आपण मतदार म्हणून आपली पात्रता निश्चित केलीत की, कृपया मतदानाच्या सूचना वाचा.

मतदाराची अपात्रता, ज्या वर्षी कृती घडेल त्या निवडणूक वर्षासाठी, पुढील दिलेल्या कृतींच्या आधारे ठरेल:

  • मतासाठी कोणतेही प्रोत्साहन देणे (आर्थिक किंवा अन्य प्रकारची सेवा, जसे कि रसिककृती).
  • कोणत्याही उमेदवाराचे टोपणनाव फोडणे, किंवा ज्यांनी ते नाते सार्वजनिक करणे निवडलेले नाही अश्या OTW सदस्यांची किंवा स्वयंसेवकांच्या कायदेशीर आणि रसिक-नावांची दुवा जोडणे.