OTW मध्ये कोणत्या जागा निवडून येतात?

फक्त बोर्डाचे संचालक निवडले जातात. बोर्डाचे संचालक हा अशा व्यक्तींचा गट आहे जे OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) चे मुख्य आहेत. या मध्ये तीन अधिकाऱ्यांचा (अध्यक्ष, खजिनदार व सचिव) समावेश आहे व त्याच बरोबर अधिकारी नसलेले सदस्य सुद्धा आहेत. व्यक्ती एका विशिष्ट अधिकारासाठी लढत नाहीत, ते बोर्डातल्या जागेसाठी लढतात आणि बोर्डाचे सदस्य सामुहिक-रित्या गटामधून अधिकारी निवडतात जेव्हा त्यांचा अधिकार कालावधी संपुष्टात येतो (अधिकार कालावधी संचालक कालावधी पेक्षा लहान असतो).

कमीतकमी दोन संचालक दर वर्षी निवडले जातात (OTW च्या देय सदस्यांच्या निवडणूकीत), व सद्ध्या ते तीन वर्ष कालावधीसाठी सेवेत असतात.

बोर्डाचे संचालक सदस्य काय काम करतात?

गट म्हणून, त्यांच्या कर्तव्यांमध्ये नीति नियोजन करणे आणि OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) च्या मिशन, वार्षिक अर्थसंकल्प, प्रकल्प व प्राधान्ये, यासंदर्भात निर्णय घेणे; संघटनेचे दीर्घकालीन लक्ष्य सांभाळणे; नीति-ध्येय साधणाऱ्या प्रगतीवर देखरेख करणे; संस्थेचे कायदेशीर अनुपालन सुनिश्चित करणे; संस्थेची व संस्थेच्या IRS बरोबरच्या अर्थ-संबंधी कायदेशीर जवाबदारी; करारांवर हस्ताक्षरी करणे, निधी वितरण, व विविध प्रकारचे व्यावसायीक व्यवहार करणे; हे सर्व सामील असते.

वैयक्तिकपणे, बोर्डाच्या सदस्यांकडून, संवादात्मक बैठकांमध्ये उपस्थिती; संस्थे संबंधित संपर्क व अहवाल यांसदर्भात अद्ययावत असणे; व OTW च्या उत्तम फायद्याच्या विश्वासाने कृती करणे, आपेक्षित असते.

मला लढण्या आधी समिती वर सेवा का करावी लागणार आहे?

समिती वर सेवा केल्यामुळे, OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) च्या अंतर्गत कार्यपद्धती विषयी उमेदवाराचा विशिष्ट पातळी चा परिचय, तसेच त्यांची इतरांबरोबर ऑनलाइन काम करण्याची क्षमता यांविषयी खात्री होते. उमेदवाराची OTW व OTW च्या मुल्यांविषयी वचनबद्धता सुद्धा असे केल्याने प्रदर्शित होते.

मी कायदेशीर नाव वापरण्याची काय गरज आहे?

संचालक OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) व त्याच्या अर्थव्यवस्थेसाठी कायदेशीर रित्या जबाबदार असल्यामुळे, त्यांच्या कृती त्यांच्या कायदेशीर ओळखीशी बांधलेल्या असतात. OTW सारख्या समाविष्ट ना-नफा संस्थांसाठी, IRS ने घातलेल्या नियमांचा हा एक भाग आहे.

माझे कायदेशीर नाव व रसिक-ओळख जोडले जातील का?

जर तुम्ही तसे निवडले, जसेकी तुमच्या रसिक-ओळखीचा उल्लेख तुम्ही निवडणूक प्रक्रिये साठी प्रस्तुत उमेदवार ओळखनाम्या मधे केला असेल तरच. OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) कर्मचारी व कागदपत्रे तुम्हाला फक्त तुमच्या कायदेशीर नावाने उल्लेखित करतील.