FAQ

आढावा

OTW ही रसिक संघटना आहे. उमेदवारांची रसिक-ओळख सार्वजनिकरित्या उघड का केली जात नाही?

बहुसंख्य लोक जरी त्यांची रसिक-ओळख त्यांच्या कायदेशीर ओळखीशी जोडण्यास सहमत असले, तरी विविध कारणांमुळे सगळ्यांसाठी तसे लागू नाही. OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) चे धोरण हा निर्णय उमेदवाराच्या हातात ठेवते; ते रसिक-ओळख प्रदर्शित करण्यास किती प्रमाणात तयार आहेत हे त्यांच्यावर अवलंबून आहे. निवडणूकीच्या आधी व नंतर दोन्ही वेळी, जे उमेदवार निवडून येतील व जे येणार नाहीत त्या सर्वांना हे लागू आहे.

विशिष्ट जागांसाठी विशिष्ट आवश्यकता आहेत का?

बोर्डाच्या अधिकाऱ्यांना (अध्यक्ष, खजिनदार, व सचिव) अधिकारी होण्या आधी बोर्डावर अनुभव असणे अपेक्षित आहे. अन्यथा, इतर जागांसाठी नाही.

माझे कायदेशीर नाव व रसिक-ओळख जोडले जातील का?

जर तुम्ही तसे निवडले, जसेकी तुमच्या रसिक-ओळखीचा उल्लेख तुम्ही निवडणूक प्रक्रिये साठी प्रस्तुत उमेदवार ओळखनाम्या मधे केला असेल तरच. OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) कर्मचारी व कागदपत्रे तुम्हाला फक्त तुमच्या कायदेशीर नावाने उल्लेखित करतील.

मी कायदेशीर नाव वापरण्याची काय गरज आहे?

संचालक OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) व त्याच्या अर्थव्यवस्थेसाठी कायदेशीर रित्या जबाबदार असल्यामुळे, त्यांच्या कृती त्यांच्या कायदेशीर ओळखीशी बांधलेल्या असतात. OTW सारख्या समाविष्ट ना-नफा संस्थांसाठी, IRS ने घातलेल्या नियमांचा हा एक भाग आहे.

मला लढण्या आधी समिती वर सेवा का करावी लागणार आहे?

समिती वर सेवा केल्यामुळे, OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) च्या अंतर्गत कार्यपद्धती विषयी उमेदवाराचा विशिष्ट पातळी चा परिचय, तसेच त्यांची इतरांबरोबर ऑनलाइन काम करण्याची क्षमता यांविषयी खात्री होते. उमेदवाराची OTW व OTW च्या मुल्यांविषयी वचनबद्धता सुद्धा असे केल्याने प्रदर्शित होते.

उमेदवार होण्यास कोण पात्र आहे?

पात्रता संदर्भातील माहिती साठी कृपया उमेदवार होणे हे बघा.

बोर्डाचे संचालक सदस्य काय काम करतात?

गट म्हणून, त्यांच्या कर्तव्यांमध्ये नीति नियोजन करणे आणि OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) च्या मिशन, वार्षिक अर्थसंकल्प, प्रकल्प व प्राधान्ये, यासंदर्भात निर्णय घेणे; संघटनेचे दीर्घकालीन लक्ष्य सांभाळणे; नीति-ध्येय साधणाऱ्या प्रगतीवर देखरेख करणे; संस्थेचे कायदेशीर अनुपालन सुनिश्चित करणे; संस्थेची व संस्थेच्या IRS बरोबरच्या अर्थ-संबंधी कायदेशीर जवाबदारी; करारांवर हस्ताक्षरी करणे, निधी वितरण, व विविध प्रकारचे व्यावसायीक व्यवहार करणे; हे सर्व सामील असते.

वैयक्तिकपणे, बोर्डाच्या सदस्यांकडून, संवादात्मक बैठकांमध्ये उपस्थिती; संस्थे संबंधित संपर्क व अहवाल यांसदर्भात अद्ययावत असणे; व OTW च्या उत्तम फायद्याच्या विश्वासाने कृती करणे, आपेक्षित असते.

OTW मध्ये कोणत्या जागा निवडून येतात?

फक्त बोर्डाचे संचालक निवडले जातात. बोर्डाचे संचालक हा अशा व्यक्तींचा गट आहे जे OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) चे मुख्य आहेत. या मध्ये तीन अधिकाऱ्यांचा (अध्यक्ष, खजिनदार व सचिव) समावेश आहे व त्याच बरोबर अधिकारी नसलेले सदस्य सुद्धा आहेत. व्यक्ती एका विशिष्ट अधिकारासाठी लढत नाहीत, ते बोर्डातल्या जागेसाठी लढतात आणि बोर्डाचे सदस्य सामुहिक-रित्या गटामधून अधिकारी निवडतात जेव्हा त्यांचा अधिकार कालावधी संपुष्टात येतो (अधिकार कालावधी संचालक कालावधी पेक्षा लहान असतो).

कमीतकमी दोन संचालक दर वर्षी निवडले जातात (OTW च्या देय सदस्यांच्या निवडणूकीत), व सद्ध्या ते तीन वर्ष कालावधीसाठी सेवेत असतात.


उमेदवारी

प्रचाराची प्रक्रिया कशी असते?

पहिले, आपण एक बायो लिहाल. हा एक छोटा परिच्छेद असेल ज्यामधे आपले ॲाफलाईन, OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) मधील, व रसिकगटातील संबंधित अनुभव तपशीलवार नमूद केले जातील.

दुसरे, आपण जाहीरनाम्यातील प्रश्नांची उत्तरे द्याल, जे सर्व उमेदवारांसाठी सारखे असतील.

तिसरे, आपण प्रश्नोत्तरांच्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हाल. प्रश्न जनतेकडून प्रस्तुत केलेले असतील.

चौथे, आपण सार्वजनिक चर्चांमध्ये उपस्थित असाल. निवडणूक समिती आपल्या वेळापत्रकाप्रमाणे ते आयोजित करतील.

मी परत लढू शकीन का?

होय, आपण निवडले गेले नसाल, तर आपण पुढच्या निवडणूकीत लढू शकाल, अर्थातच त्या वेळी सुद्धा आपण पात्रतेचे निकष पूर्ण करीत असाल तर.

विरोधी निवडणूक व बिनविरोध निवडणूक यात फरक काय?

जेव्हा बोर्डाच्या उपलब्ध जागांपेक्षा अधिक उमेदवार असतात, व कोण निवडले जाईल हे मतदार निवडतात तेव्हा विरोधी निवडणूक होते.

उपलब्ध जागा उमेदवारांच्या आकड्या एवढ्या किंवा त्यापेक्षा जास्त असतील तर बिनविरोध निवडणूक होते. प्रत्येक उमेदवार हा तांत्रिकदृष्ट्या बिनविरोध असतो व आपोआप निवडणूक प्रक्रियेनंतर बोर्डावर निवडला जातो (मतदानाशिवाय, ज्याची गरज उरत नाही). सर्व रिकाम्या जागा पुढील निवडणुकीपर्यंत रिकाम्या राहतील.

मी उमेदवारी कशी घोषित करू?

आपण पात्रतेच्या आवश्यकता पूर्ण करत आहात व आपल्या कायदेशीर नावा अंतर्गत लढण्याची आपली तयारी आहे याची खात्री असू द्या. निवडणूक अध्यक्षास आपले कायदेशीर नाव व आपण १८ वय वर्षांच्या वर आहात हे विधान ईमेल करा. आपण स्युडोनावाच्या अंतर्गत लढू इच्छित असाल तर तसे व आपल्याला आपले OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) नाव आपल्या कायदेशीर नावात बदलायचे असल्यास, तसे निवडणूक समितीला उमेदवारी च्या आधी किंवा निवडणूकीच्या नंतर कळवा. निवडणूक समिती योग्य समित्यांसह तपासून आपली पात्रता सत्यापित करतील. उमेदवारी घोषणेची समयसीमा निवडणूक काळरेषा इथे नमूद केलेली असेल.

OTW ची प्रतीकचिन्हे प्रचारादरम्यान वापरली जाऊ शकतात का?

प्रचारादरम्यान, अश्या चित्रांचा वापर टाळा जी OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) ची अधिकृत प्रतीकचिन्हे (किंवा अशी चित्रे जी गैरसमजाने OTW ची अधिकृत प्रतीकचिन्हे म्हणून समजली जाऊ शकतात), Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) सारख्या वैयक्तिक प्रकल्पांची प्रतीकचिन्हे धरून, असतील. तुम्ही अशी प्रतीकचिन्हे असलेल्या OTW च्या अधिकृत घोषणा रेब्लॉग किंवा रिट्विट करू शकता, पण कृपया त्या प्रतीकचिन्हांना एखाद्या विशिष्ट उमेदवाराशी किंवा उमेदवारांशी जोडू नका. ह्याचे कारण आहे की एखाद्या उमेदवाराला किंवा उमेदवारांना OTW पुष्टी देत आहे हा प्रभाव टाळायचा आहे.


मतदान

उमेदवारांचे श्रेणी-क्रमांक मला कळू शकतील का?

बोर्डाच्या सदस्यांमध्ये समता ठेवण्याच्या उद्देशाने, आम्ही उमेदवारांचे श्रेणी-क्रमांक प्रसिद्ध करीत नाही.

आम्हाला निकाल कधी कळतील?

मतदान पूर्ण झाल्यानंतरच पूर्ण निकाल घोषित केला जाईल; अकस्मात अडचणी सोडता, मतदानाच्या तीन दिवसांमध्ये आम्ही निकाल घोषित करू. जर विलंब होणार असेल, तर निवडणुक समिती कारण व उपायाची सद्य स्थिती पोस्ट करेल.

मतदानाची प्रक्रिया कशी कार्यरत होते?

पात्र मतदार—सर्व देणगीदार सदस्य ज्यांचे चांगले संबंध आहेत—त्यांस, ते जो ईमेल पत्ता वापरून संस्थेशी जोडले आहेत त्यावर सूचना पाठविल्या जातील. सर्व मतपत्रिका निनावी असतात.

झटपट रनऑफ मतदानाची अनेक-विजेते निवडणूक सुधारित-आवृत्ती वापरून मतमोजणी केली जाईल. पूर्ण स्पष्टीकरणासाठी, कृपया मतदान प्रक्रिया माहिती पृष्ठ बघा.

मी माझा वेळ प्रदान करून OTW चा सदस्य का होऊ शकत नाही?

कायद्याने ओळखली जाणारी ना-नफा संस्था असल्यामुळे, प्रत्येक मत भिन्न, कायद्याने ओळखू शकण्याऱ्या व्यक्ती कडून येत आहे याची खात्री करण्यास आम्ही बंधनकारक आहोत. असे करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे सभासदत्वास बॅंक खाते किंवा क्रेडिट कार्ड द्वारे केल्या असलेल्या देणगीसह जोडणे—म्हणजेच्, देणगीची अशी पद्धत जी ओळख प्रस्थापित करते. या नितितत्वामुळेच रोख रक्कम किंवा मनी ऑर्डर ने दिली असलेली देणगी सदस्यत्व प्रदान करीत नाही.

मी $१० पेक्षा जास्त पैसे दान केले होते, मला निवडणूकीबद्दल काही माहिती का नाही प्राप्त झाली?

अनेक कारणे असू शकतात:

  1. तुमची देणगी निवडणूक वर्षाच्या आधी दिली होती का? जर तुम्हाला खात्री नसेल तर, तुम्ही पुनस्तपासणी साठी अर्थपुरवठा व सदस्य समितीशी संपर्क करू शकता. चालु निवडणूक वर्षी दिल्या असलेल्या देणग्याच सदस्यांना त्या वर्षीच्या निवडणुकीत मतदान करण्यास पात्र करतात.
  2. आपण OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) च्या ईमेल मधून सदस्यता मागे घेतली आहे का? तसे असेल तर [email protected] इथे ईमेल करा व यादी मध्ये परत या.
  3. OTW चे ईमेल्स तुमच्या स्पॅम फोल्डर मध्ये जात नाहीत ना? तुम्हाला तसे होणे टाळायचे असल्यास, @transformativeworks.org ला विश्वासार्ह संपर्कांमध्ये सामील करा.

जर वरचे काहीच लागू होत नसेल, आम्हाला संपर्क करा आणि आम्ही समस्येचे निवारण करण्याचा प्रयत्न करू.

निवडणूकीत मतदान करण्यास मी कसे पात्र ठरू शकीन?

तुम्ही OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) चे सदस्य होऊ शकता १० USD किंवा जास्त ची देणगी देऊन. तुम्ही देणगी दिलेल्या दिवसापासून पुढे एक वर्ष सभासदत्व टिकते. हे करून तुम्ही एका निवडणुकीमध्ये मतदान करण्यास पात्र ठरता. तुम्ही सदस्य असाल व तुम्ही पुन्हा $१० दान केलेत तर तुमचे सभासदत्व संपण्याची तारीख पुढे ढकलली जाते; तारीख नेहमी तुमच्या सर्वात अलीकडील देणगीपासून एक वर्ष असते. या वर्षीच्या निवडणुकीचा मतदार कालावधी बघण्यासाठी निवडणूक काळरेषा पहा.


प्रतिनिधी द्वारा मतदान

प्रतिनिधी द्वारा मतदान म्हणजे काय? ते कसे काम करते?

प्रतिनिधी द्वारा मत म्हणजे निवडणुकी दरम्यान इतर कोणाला आपले मत देण्यास नेमणे, ज्यास डेलावेर कायद्या नुसार OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) ला अनुमती देण्यास आवश्यक आहे. विशेषतः, जेव्हा सदस्य इंटरनेट च्या कक्षेच्या बाहेर असतील, किंवा निवडणुकीच्या काळात त्यांना इतर वचनबद्धता असतील तेव्हा हे केले जाते.

जर एखाद्या सदस्याला चाचणी मतपत्रिकेवर जाता येत नसेल, उदाहरणार्थ ते कालबाह्य सॅाफ्टवेअर वापरत असतील किंवा इतर सॅाफ्टवेअर सुसंगती समस्यांमुळे त्यांना मतपत्रिका बघता येत नसेल, तर त्यांना खऱ्या मतपत्रिकेसोबतही याच अडचणी येतील व त्यांनी प्रतिनिधी नेमणे योग्य राहिल. आपण स्वतः आपला प्रतिनिधी नेमणे गरजेचे आहे. निवडणूक समिती आणि OTW सदस्यांकरीता प्रतिनिधी नेमत नाहीत.

प्रतिनिधी ईमेल द्वारे नेमले जातात. प्रतिनिधी साठी विनंती ईमेल मध्ये हे असणे आवश्यक आहे

  1. आपल्या ईमेल खात्यातून तो अस्तित्वात आला पाहिजे जे OTW ला दान करण्यासाठी वापरले जाते;
  2. आपल्या प्रतिनिधी आणि [email protected] (निवडणूक-अध्यक्ष) या दोघांच्या पत्त्यावर पाठवावा;
  3. आपले कायदेशीर नाव सामिल असावे; आणि
  4. आपल्याला ईमेल केलेल्या व्यक्तीस प्रतिनिधी नेमायचे आहे ही घोषणा त्यात सामिल असावी.

ईमेल मिळाल्याची पावती व त्यांचे कायदेशीर नावासकट आपल्या प्रतिनिधीने त्या ईमेल ला प्रत्युत्तर देणे आवश्यक आहे. हे प्रत्युत्तर [email protected] यांना निवडणुकीच्या निदान दोन आठवडे आधी प्राप्त होणे गरजेचे आहे. जर आपल्याला आपले प्रतिनिधी बदलायचे किंवा काढायचे असतील, आपण ह्याच अंतिम मुदतीपर्यंत हे करू शकता.
प्रतिनिधी नेमणुकीची अधिकृत अंतिम मुदत निवडणुक कालरेषा येथे समाविष्ट असेल.

प्रतिनिधी नेमणुकीच्या अंतिम मुदतीनंतर, प्रतिनिधी नेमणुक सहा महिन्यांसाठी नमूद राहते; ते सहा महिने पार पडल्याशिवाय, आम्ही आपली प्रतिनिधी नेमणुक बदलू किंवा मागे घेऊ शकत नाही. जर आपण कोणाचेतरी प्रतिनिधी मतदार म्हणून नेमले गेले असाल, तर आपण ते दुसऱ्या कोणास देऊ शकत नाही.


अधिक माहिती

माझ्या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळाले नाही.

आमच्या संपर्क फॉर्म द्वारे आपण आमच्याशी संपर्क साधू शकता. आम्ही मदतीसाठी आनंदी आहोत!

निवडणुकीबद्दल मी अधिक कुठे जाणून घेऊ?

सर्व निवडणुकांच्या माहितीसाठी निवडणूक साइट ही आपली सर्वोत्तम पैज आहे. आमच्याकडे वर्तमान बातमी आणि इतिहास दोन्ही विभाग आहेत, तसेच बाजूला सूचीबद्ध अधिक तपशीलवार श्रेणी आहेत.