प्रतिनिधी द्वारा मत म्हणजे निवडणुकी दरम्यान इतर कोणाला आपले मत देण्यास नेमणे, ज्यास डेलावेर कायद्या नुसार OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) ला अनुमती देण्यास आवश्यक आहे. विशेषतः, जेव्हा सदस्य इंटरनेट च्या कक्षेच्या बाहेर असतील, किंवा निवडणुकीच्या काळात त्यांना इतर वचनबद्धता असतील तेव्हा हे केले जाते.
जर एखाद्या सदस्याला चाचणी मतपत्रिकेवर जाता येत नसेल, उदाहरणार्थ ते कालबाह्य सॅाफ्टवेअर वापरत असतील किंवा इतर सॅाफ्टवेअर सुसंगती समस्यांमुळे त्यांना मतपत्रिका बघता येत नसेल, तर त्यांना खऱ्या मतपत्रिकेसोबतही याच अडचणी येतील व त्यांनी प्रतिनिधी नेमणे योग्य राहिल. आपण स्वतः आपला प्रतिनिधी नेमणे गरजेचे आहे. निवडणूक समिती आणि OTW सदस्यांकरीता प्रतिनिधी नेमत नाहीत.
प्रतिनिधी ईमेल द्वारे नेमले जातात. प्रतिनिधी साठी विनंती ईमेल मध्ये हे असणे आवश्यक आहे
- आपल्या ईमेल खात्यातून तो अस्तित्वात आला पाहिजे जे OTW ला दान करण्यासाठी वापरले जाते;
- आपल्या प्रतिनिधी आणि [email protected] (निवडणूक-अध्यक्ष) या दोघांच्या पत्त्यावर पाठवावा;
- आपले कायदेशीर नाव सामिल असावे; आणि
- आपल्याला ईमेल केलेल्या व्यक्तीस प्रतिनिधी नेमायचे आहे ही घोषणा त्यात सामिल असावी.
ईमेल मिळाल्याची पावती व त्यांचे कायदेशीर नावासकट आपल्या प्रतिनिधीने त्या ईमेल ला प्रत्युत्तर देणे आवश्यक आहे. हे प्रत्युत्तर [email protected] यांना निवडणुकीच्या निदान दोन आठवडे आधी प्राप्त होणे गरजेचे आहे. जर आपल्याला आपले प्रतिनिधी बदलायचे किंवा काढायचे असतील, आपण ह्याच अंतिम मुदतीपर्यंत हे करू शकता.
प्रतिनिधी नेमणुकीची अधिकृत अंतिम मुदत निवडणुक कालरेषा येथे समाविष्ट असेल.
प्रतिनिधी नेमणुकीच्या अंतिम मुदतीनंतर, प्रतिनिधी नेमणुक सहा महिन्यांसाठी नमूद राहते; ते सहा महिने पार पडल्याशिवाय, आम्ही आपली प्रतिनिधी नेमणुक बदलू किंवा मागे घेऊ शकत नाही. जर आपण कोणाचेतरी प्रतिनिधी मतदार म्हणून नेमले गेले असाल, तर आपण ते दुसऱ्या कोणास देऊ शकत नाही.