लौरे डौबन चे जीवनचरित्र व व्यासपीठ

जीवनचरित्र

लौरे डौबन ने भाषांतराच्या शिक्षणानंतर बऱ्याच नोकऱ्या बदलल्या आहेत. तिने प्रकाशन, विडिओ गेम्स, काही काळासाठी फॅशन, मुद्रणालय आणि तांत्रिक आधार येथे काम केले आहे. पुरेशी विविधता नसल्याने आत्ताच्या घडिला ती फ्रान्स मध्ये परत वेब डेव्हलपर बनण्यासाठी शिकत आहे.

लौरे ला आता नक्की आठवतही नाही की तिने रसिककथांचा शोध कधी लावला, पण तिचे Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) खाते सांगते की ती तिथे २०१३ पासून आहे. ती पुरेसं मार्दव्य, चिंता आणि प्रणय असलेल्या कुठल्याही रसिकगटात वाचन करू शकते, ते सगळे एकत्र असेल तर अजूनच उत्तम.

ती मे २०१९ मध्ये OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) ला फ्रेंच अनुवादक म्हणून सामील झाली, ६ महिन्यांनंतर भाषांतर समितीमध्ये स्वयंसेवक व्यवस्थापक म्हणून पेरली गेली. हे झाल्यामुळे तिला इतर समित्यांशी संवाद साधायला तर मिळालाच पण स्वतःच्या कथा सुरु करण्याचेही प्रोत्साहन मिळाले. Read More