यावर्षीच्या निवडणुकीत आमच्या सर्व उमेदवारांनी केलेल्या मेहनतीसाठी, निवडणूक समिती आपले आभार मानू इच्छित आहे. त्यासह, आम्ही २०२२ च्या निवडणुकीचा निकाल सादर करण्यास आनंदित आहोत.
खालील उमेदवार (वर्णक्रमानुसार) अधिकृत-पणे संचालक मंडळावर निवडले गेले आहेत:
- हेदर मक्गवायर
- नतालिया ग्रुबेर
आधी सांगितल्याप्रमाणे, संचालक मंडळाला हे जाहीर करताना खेद वाटतो की २०२१ मध्ये निवडून आलेले संचालक ए. अना सेगेदी यांनी २०२२ च्या निवडणुकीपूर्वी बोर्डावरील तिच्या पदावरून माघार घेतली आहे. ए. अना सेगेदी यांच्या सेवेबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत आणि त्यांच्या कार्य आणि समर्पणाबद्दल त्यांचे आभार मानतो.
रिक्त जागा भरण्यासाठी, या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर असलेला उमेदवार, मिशेल श्रोडर, संचालक मंडळात सामील होणार आणि ते १ ऑक्टोबरपासून, ए. अना सेगेदीच्या उर्वरित कार्यकाळ (२ वर्षे) काम करतील. पुढील निवडणुकीपर्यंत आमच्याकडे पूर्ण मंडळ कायम राहील याची हमी मिळेल.
औपचारिक-रित्या, बोर्डाची उलाढाल १ ऑक्टोबर पासून सुरू होणार. आम्ही मंडळाच्या नवीन सदस्यांना त्यांच्या सत्राबद्दल शुभेच्छा देतो.
अशा पद्धतीने, निवडणुकीचा हंगाम संपुष्टात आला आहे. बातम्यांचा प्रसार करून, उमेदवारांना प्रश्न विचारून आणि मतदान करून सहभागी झालेल्या प्रत्येकाचे आम्ही आभारी आहोत! आम्ही पुढच्या वर्षी पुन्हा आपणां सर्वांना भेटण्यास उत्सुक आहोत.
OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदे-विषयक मदत सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन-चलित, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दाता-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाईटवर. स्वयंसेवक अनुवादकांची टीम, ज्यांनी ही पोस्ट अनुवादित केली आहे, त्यांच्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, भाषांतर पृष्ठ पहा.