२०२१ साठी OTW ची निवडणूक आकडेवारी

आता २०२१ ची निवडणूक संपली असल्यामुळे, आम्हाला आमची मतदानाची आकडेवारी आपल्याला सांगण्यास आनंद होत आहे!

२०२१ च्या निवडणुकीसाठी आमच्याकडे ११,२३१ पात्र मतदार होते. त्यापैकी २,३०५ मतदारांनी मतदान केले, जे संभाव्य मतदारांच्या २०.५% आहे. मागील वर्षीच्या तुलनेत आमचे यावर्षीच्या मतदार कमी आहे, ज्यांचे मतदान २१.४% होते. आम्ही टाकलेल्या मतपत्रिकांच्या संख्येत घट देखील दिसून आली; २,८५८ ते २,३०५ पर्यंत, जे १९.३% घट दर्शवते. Read More

२०२१ OTW निवडणुकीचा निकाल

यावर्षीच्या निवडणुकीत आमच्या सर्व उमेदवारांनी केलेल्या मेहनतीसाठी, निवडणूक समिती आपले आभार मानू इच्छित आहे. त्यासह, आम्ही २०२१ च्या निवडणुकीचा निकाल सादर करण्यास आनंदित आहोत.

खालील उमेदवार (अक्षरक्रमानुसार) अधिकृत-पणे संचालक मंडळावर निवडले गेले आहेत:

  • इ. ॲना सेगेडी
  • केरी डेटन

याव्यतिरिक्त, संचालक मंडळाला हे घोषण करताना दुख होत आहे की संचालक काटी एगाऱ्ट, जी मागच्या वर्षी निवडली गेली होती, त्वरित प्रभावी, काही वैयक्तिक कारणांमुळे बोर्ड मधला आपला स्थान सोडती आहे. आम्ही काटीच्या सेवेबद्दल आभारी आहोत आणि तिच्या कामासाठी आणि समर्पणासाठी आम्ही तिला धन्यवाद देतो.

ही रिक्त जागा भरायला, ज्या उमेदवाराने या निवडणुकीत तिसरे स्थान मिळवले अँटोनियस मेलिसे, संचालक मंडळ मध्ये सामील होतील आणि ऑक्टोबर १ पासून ते काटी ची उरलेली कालावधी (२ वर्ष) साठी बोर्ड ला त्यांची सेवा देतील. हे हमी देईल की आमच्याकडे पुढील निवडणुकीपर्यंत पूर्ण बोर्ड असेल.

औपचारिक-रित्या, बोर्डाची उलाढाल १ ऑक्टोबर पासून सुरू होईल. आम्ही मंडळाच्या नवीन सदस्यांना त्यांच्या सत्राबद्दल शुभेच्छा देऊ इच्छितो.

अशा पद्धतीने, निवडणुकीचा हंगाम संपुष्टात आला आहे. बातम्यांचा प्रसार करून, उमेदवारांना प्रश्न विचारून आणि मतदान करून सहभागी झालेल्या प्रत्येकाचे आम्ही आभारी आहोत! आम्ही पुढच्या वर्षी पुन्हा आपणां सर्वांना भेटण्यास उत्सुक आहोत.


OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिक-मुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदे-विषयक मदत सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन-चलित, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दाता-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाईटवर स्वयंसेवक अनुवादकांची टीम, ज्यांनी ही पोस्ट अनुवादित केली आहे, त्यांच्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, भाषांतर पृष्ठ पहा.

२०२१ OTW बोर्डाचे मतदान आता खुले!

निवडणूक खुली आहे!

प्रत्येक नवीन OTW (परिवर्तनात्मक रसिककला मंडळी) सदस्य जे जुलै १, २०२० ते जून ३०, २०२१ मध्ये दाखल झाले आहेत त्यांना मतपत्रिका प्राप्त की झाली असेल. जर तुम्हाला मिळाली नसेल तर तुमचे स्पॅम फोल्डर आधी तपासा, व नंतर आमच्याशी या तर्फे संपर्क करा संपर्क फाॅर्म. कृपया नोंद असू द्या कि आपली देणगी पावती US पूर्व वेळेप्रमाणे दिनांकित असेल, म्हणून जर आपली देणगी जून ३०, २०२१ रोजी १९:५९ नंतर नोंद झाली असेल, तर आपण मतदान करण्यास पात्र नसाल. जर आपल्याला खात्री नसेल कि आपली देणगी अंतिम मुदतीच्या आधी दिली गेली आहे कि नाही, तर कृपया आमच्या वेबसाईट वरील संपर्क फॉर्म वापरून व “Is my membership current/Am I eligible to vote?(माझे सभासदत्व चालू आहे का/मी मतदान करण्यास पात्र आहे का?)” हे निवडून आमच्या अर्थपुरवठा व सदस्यता समितीशी संपर्क करा.

निवडणूक ऑगस्ट १६, २०२१ या दिवशी चालू असेल, २३:५९ UTC; ही वेळ तुमच्या साठी कुठली असेल हे जाणून घेण्यासाठी, वेळ क्षेत्र कन्व्हर्टर हे पहा.

तुमचे मतदान झाले की तुम्ही ट्विटर वर जाऊन इतर मतदात्यांशी भेटण्यास व बोलण्यास हॅशटॅग #OTWE2021 वापरू शकता! आम्हाला तुमचे प्रतिसाद ऐकणे खूप आवडेल!


OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदे-विषयक मदत सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन-चलित, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दाता-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाईटवर. स्वयंसेवक अनुवादकांची टीम, ज्यांनी ही पोस्ट अनुवादित केली आहे, त्यांच्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, भाषांतर पृष्ठ पहा.

OTW सदस्य – मतदानाच्या सूचनांसाठी आपला ईमेल तपासा

यावेळी, मतदानास पात्र असलेल्या OTW (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी) च्या सर्व सदस्यांना २०२१ च्या मतदानाच्या सूचनांशी जोडलेला ईमेल मिळाला असेल. विषय “Voting Instructions for Organization for Transformative Works (OTW) Board Election” (OTW बोर्ड निवडणुकीसाठी मतदान सूचना) होता. कृपया लक्षात घ्या की ज्यांना हा ई-मेल मिळाला नाहीये ते ह्यावर्षी मतदार यादी मध्ये नाहीयेत आणि त्यांना मतपत्रिका मिळणार नाही.

मतदान सूचना ईमेलमध्ये मतपत्रिकेच्या चाचणी आवृत्तीचा दुवा आहे. कृपया पृष्ठ योग्य प्रकारे प्रदर्शित होत आहे आणि उमेदवार नीट दिसत आहेत याची खात्री करण्यासाठी त्या दुव्याचे अनुसरण करा. नसल्यास, कृपया खात्री करा की आपण ajax.googleapis.com, bootstrapcdn.com, आणि/किंवा opavote.com वरून जावास्क्रिप्ट अवरोधित करत नाही आहेत.
Read More

२०२१ OTW निवडणुकांचे उमेदवार घोषणा

उमेदवार घोषणा

OTW(परिवर्तनात्मक रसिककला मंडळी) आनंदाने आमच्या उमेदवारांची घोषणा खालील प्रमाणे करू इच्छितो (पहिल्या नावाच्या अक्षर क्रमानुसार):

  • अँटोनियस मेलिसे
  • इ. ॲना सेगेडी
  • केरी डेटन
  • लॉर दुबन

कारण आम्हाला २ जागा भरायच्या आहेत आणि ४ उमेदवार आहेत, २०२१ वर्षाची निवडणूकस्पर्धेची असेल– म्हणजे, OTW चे सदस्य, कुठले उमेदवार जागा भरतील, या साठी मतदान करतील. Read More

एनटोनियस मेलीसेचे जीवनचरित्र आणि व्यासपीठ

जीवनचरित्र

एनटोनियस मेलीसे नेदरलँडस मधनं असा माणूस आहे ज्याचा हा ठाम विश्वास आहे की माणसाने कधीच नव्या गोष्टी शिकणे थांबवायला नाही पाहिजे. त्याला बरीच प्रमाणपत्रे मिळाली आहेत, विद्यापीठात आणि अन्यथा, इंग्रजी भाषा व साहित्य, पत्रकारिता, सॉफ्टवेअर चाचणी चे दोन प्रकार (ISTQB आणि TMAP Next) आणि PHP विकास मध्ये. आत्ता तो Symfony बॅक-एंड विकसक म्हणून काम करतो आहे.

मागील व्यवस्थापन अनुभवाबद्दल सांगायचे तर, तो एका संगीत-नाट्य गटा मध्ये होता (बास म्हणून गाताना), तेव्हा तो त्यांचा एक बोर्ड सदस्य पण होता, आणि त्याने एक व्यवस्थापन नोकरी पण केली होती ज्याच्यात उन्हाळ्यात नोकरी शोधणार्‍या विद्यार्थ्यांचा तो प्रभारी होता.

त्याला रसिकगटाची ओळख त्याच्या काही दीर्घकालीन मित्रांनी करून दिली, ज्यांच्यासोबत तो World of Warcraft (युद्धकौशल्याचं जग) खेळायचा. एकत्र ते आपल्या गिल्ड च्या मंचावर कथा आणि मूळ गोष्टीं लिहायचे. जेव्हा एका मित्राने उल्लेख केला की ते OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) साठी काही वेळापासून भाषांतर करत आहेत आणि डच भाषा संघा मध्ये एक जागा रिकामी झाली आहे, त्याने ही संधी घेतली आणि तो फेब्रुवरी २०१६ पासून भाषांतर समितीचा भाग आहे. तो काही काळ नियम आणि तक्रारनिवारण समितीच्या कामातही सहभागी झाला आहे.

सध्या, तो अनेक वेळी थोड्या रसिकध्वनिफीती बनवतो, सहसा The Witcherसाठी, परंतु त्याला सर्वच कल्पनारम्य आणि वैज्ञानिक कल्पनांच्या रसिक गटांचे कौतुक वाटते. Read More