जीवनचरित्र
एनटोनियस मेलीसे नेदरलँडस मधनं असा माणूस आहे ज्याचा हा ठाम विश्वास आहे की माणसाने कधीच नव्या गोष्टी शिकणे थांबवायला नाही पाहिजे. त्याला बरीच प्रमाणपत्रे मिळाली आहेत, विद्यापीठात आणि अन्यथा, इंग्रजी भाषा व साहित्य, पत्रकारिता, सॉफ्टवेअर चाचणी चे दोन प्रकार (ISTQB आणि TMAP Next) आणि PHP विकास मध्ये. आत्ता तो Symfony बॅक-एंड विकसक म्हणून काम करतो आहे.
मागील व्यवस्थापन अनुभवाबद्दल सांगायचे तर, तो एका संगीत-नाट्य गटा मध्ये होता (बास म्हणून गाताना), तेव्हा तो त्यांचा एक बोर्ड सदस्य पण होता, आणि त्याने एक व्यवस्थापन नोकरी पण केली होती ज्याच्यात उन्हाळ्यात नोकरी शोधणार्या विद्यार्थ्यांचा तो प्रभारी होता.
त्याला रसिकगटाची ओळख त्याच्या काही दीर्घकालीन मित्रांनी करून दिली, ज्यांच्यासोबत तो World of Warcraft (युद्धकौशल्याचं जग) खेळायचा. एकत्र ते आपल्या गिल्ड च्या मंचावर कथा आणि मूळ गोष्टीं लिहायचे. जेव्हा एका मित्राने उल्लेख केला की ते OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) साठी काही वेळापासून भाषांतर करत आहेत आणि डच भाषा संघा मध्ये एक जागा रिकामी झाली आहे, त्याने ही संधी घेतली आणि तो फेब्रुवरी २०१६ पासून भाषांतर समितीचा भाग आहे. तो काही काळ नियम आणि तक्रारनिवारण समितीच्या कामातही सहभागी झाला आहे.
सध्या, तो अनेक वेळी थोड्या रसिकध्वनिफीती बनवतो, सहसा The Witcherसाठी, परंतु त्याला सर्वच कल्पनारम्य आणि वैज्ञानिक कल्पनांच्या रसिक गटांचे कौतुक वाटते. Read More