२०२१ OTW निवडणुकीचे वेळापत्रक आणि सदस्यता अंतिम मुदत

संचालक मंडळाच्या नवीन सदस्यांसाठी २०२१ च्या निवडणुकांचे वेळापत्रक प्रदर्शित केल्याची घोषणा करताना OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) च्या निवडणूक समितीला आनंद होत आहे!

या वर्षाची निवडणूक ऑगस्ट १३-१६ ला होणार आहे. याचा अर्थ असा की कर्मचार्‍यांना आपली उमेदवारी जाहीर करण्याची अंतिम मुदत जून १८ आहे.

नेहमीप्रमाणे, निवडणूक सदस्यतेची अंतिम मुदत जून ३० आहे. आपल्याला मतदान करण्याची इच्छा असल्यास, कृपया आपली सदस्यता त्या तारखेस कार्यरत असल्याचे सुनिश्चित करा. कृपया नोंद असुद्या की आपल्या देणगी पावती वर US पूर्व वेळेप्रमाणे तारीख असेल, व जर आपली देणगी पावती ३० जून, २०२१, १९.५९ नंतर नोंद झाली असेल, तर आपण मतदान करण्यास पात्र नसाल. जर आपल्याला खात्री नसेल की आपण देणगी अंतिम मुदतीच्या आधी दिली आहे वा नाही, तर कृपया आमच्या वेबसाईट वरच्या संपर्क फॉर्म हे वापरून व “Is my membership current/Am I eligible to vote?” (माझी सदस्यता वर्तमान/मी मतदान करण्यास पात्र आहे का?) हे निवडून आमच्या अर्थपुरवठा व सदस्यता समितीशी संपर्क करा. Read More