यावर्षीच्या निवडणुकीत आमच्या सर्व उमेदवारांनी केलेल्या मेहनतीसाठी, निवडणूक समिती आपले आभार मानू इच्छित आहे. त्यासह, आम्ही २०२१ च्या निवडणुकीचा निकाल सादर करण्यास आनंदित आहोत.
खालील उमेदवार (अक्षरक्रमानुसार) अधिकृत-पणे संचालक मंडळावर निवडले गेले आहेत:
- इ. ॲना सेगेडी
- केरी डेटन
याव्यतिरिक्त, संचालक मंडळाला हे घोषण करताना दुख होत आहे की संचालक काटी एगाऱ्ट, जी मागच्या वर्षी निवडली गेली होती, त्वरित प्रभावी, काही वैयक्तिक कारणांमुळे बोर्ड मधला आपला स्थान सोडती आहे. आम्ही काटीच्या सेवेबद्दल आभारी आहोत आणि तिच्या कामासाठी आणि समर्पणासाठी आम्ही तिला धन्यवाद देतो.
ही रिक्त जागा भरायला, ज्या उमेदवाराने या निवडणुकीत तिसरे स्थान मिळवले अँटोनियस मेलिसे, संचालक मंडळ मध्ये सामील होतील आणि ऑक्टोबर १ पासून ते काटी ची उरलेली कालावधी (२ वर्ष) साठी बोर्ड ला त्यांची सेवा देतील. हे हमी देईल की आमच्याकडे पुढील निवडणुकीपर्यंत पूर्ण बोर्ड असेल.
औपचारिक-रित्या, बोर्डाची उलाढाल १ ऑक्टोबर पासून सुरू होईल. आम्ही मंडळाच्या नवीन सदस्यांना त्यांच्या सत्राबद्दल शुभेच्छा देऊ इच्छितो.
अशा पद्धतीने, निवडणुकीचा हंगाम संपुष्टात आला आहे. बातम्यांचा प्रसार करून, उमेदवारांना प्रश्न विचारून आणि मतदान करून सहभागी झालेल्या प्रत्येकाचे आम्ही आभारी आहोत! आम्ही पुढच्या वर्षी पुन्हा आपणां सर्वांना भेटण्यास उत्सुक आहोत.
OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिक-मुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदे-विषयक मदत सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन-चलित, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दाता-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाईटवर स्वयंसेवक अनुवादकांची टीम, ज्यांनी ही पोस्ट अनुवादित केली आहे, त्यांच्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, भाषांतर पृष्ठ पहा.