२०२५ OTW निवडणुकीचे आकडेवारी

आता २०२५ ची निवडणूक संपली असल्यामुळे, आम्हाला आमची मतदानाची आकडेवारी आपल्याला सांगण्यास आनंद होत आहे!

२०२५ च्या निवडणुकीसाठी आमच्याकडे १५,१३८ पात्र मतदार होते. त्यापैकी २,१९७ मतदारांनी मतदान केले, जे संभाव्य मतदारांच्या २२.८% आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत आमचे यावर्षीच्या मतदार कमी आहे, ज्यांचे मतदान २२.८% होते.

आम्ही टाकलेल्या मतपत्रिकांच्या संख्येत घट देखील दिसून आली; ३,४१५ ते २,१९७ पर्यंत, जे ३५.६% घट दर्शवते. Read More

२०२५ OTWच्या(परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळाच्या) निवडणुकीचा निकाल

यावर्षीच्या निवडणुकीत आमच्या सर्व उमेदवारांनी केलेल्या मेहनतीसाठी, निवडणूक समिती आपले आभार मानू इच्छित आहे. आम्ही आमच्या निर्गमित बोर्ड संचालक, जेनिफर हेन्स आणि झिशीन झांग, त्यांच्या कार्यकाळातील सर्व कामांसाठी आभार मानू इच्छितो. त्यासह, आम्ही २०२५ च्या निवडणुकीचा निकाल सादर करण्यास आनंदित आहोत.

खालील उमेदवार (वर्णक्रमानुसार) अधिकृतपणे संचालक मंडळावर निवडले गेले आहेत:

  • एलिझाबेथ विल्टशायर
  • हार्लन लिबरमॅन-बर्ग

औपचारिक-रित्या, बोर्डाची उलाढाल १ ऑक्टोबर पासून सुरू होणार. आम्ही मंडळाच्या नवीन सदस्यांना त्यांच्या सत्राबद्दल शुभेच्छा देतो.

अशा पद्धतीने, निवडणुकीचा हंगाम संपुष्टात आला आहे. बातम्यांचा प्रसार करून, उमेदवारांना प्रश्न विचारून आणि मतदान करून सहभागी झालेल्या प्रत्येकाचे आम्ही आभार मानतो! आम्ही पुढच्या वर्षी पुन्हा आपण सर्वांना भेटण्यास उत्सुक आहोत.


OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदे-विषयक मदत सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन-चलित, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दाता-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाईटवर. स्वयंसेवक अनुवादकांची टीम, ज्यांनी ही पोस्ट अनुवादित केली आहे, त्यांच्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, भाषांतर पृष्ठ पहा.

२०२५ OTW बोर्डाचे मतदान आता खुले!

निवडणूक खुली आहे!

प्रत्येक नवीन OTW (परिवर्तनात्मक रसिककला मंडळी) सदस्य जे जुलै १, २०२४ ते जून ३०, २०२५ मध्ये दाखल झाले आहेत त्यांना मतपत्रिका प्राप्त झाली असेल. जर तुम्हाला मिळाली नसेल तर तुमचे स्पॅम फोल्डर आधी तपासा, व नंतर आमच्याशी या तर्फे संपर्क करा संपर्क फाॅर्म. देणगी पावतीची तारीख यूटीसी वेळेप्रमाणे दिली जाते. कृपया आपल्या पावतीची तारीख तपासा. जर आपली देणगी पावती ३० जून नंतरची असेल, तर आपण मतदान करण्यास पात्र नसाल. जर आपल्याला खात्री नसेल कि आपली देणगी अंतिम मुदतीच्या आधी दिली गेली आहे कि नाही, तर कृपया आमच्या वेबसाईट वरील संपर्क फॉर्म वापरून व “Is my membership current/Am I eligible to vote?(माझे सभासदत्व चालू आहे का/मी मतदान करण्यास पात्र आहे का?)” हे निवडून आमच्या अर्थपुरवठा व सदस्यता समितीशी संपर्क करा.

निवडणूक ऑगस्ट १८, २०२५ या दिवशी चालू असेल, २३:५९ UTC; ही वेळ तुमच्या साठी कुठली असेल हे जाणून घेण्यासाठी, वेळ क्षेत्र कन्व्हर्टर हे पहा.


OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदे-विषयक मदत सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन-चलित, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दाता-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाईटवर. स्वयंसेवक अनुवादकांची टीम, ज्यांनी ही पोस्ट अनुवादित केली आहे, त्यांच्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, भाषांतर पृष्ठ पहा.

OTW सदस्य – मतदानाच्या सूचनांसाठी आपला ईमेल तपासा

यावेळी, मतदानास पात्र असलेल्या OTW (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी) च्या सर्व सदस्यांना २०२५ च्या मतदानाच्या सूचनांशी जोडलेला ईमेल मिळाला असेल. विषय “Voting Instructions for Organization for Transformative Works (OTW) Board Election” (OTW (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी) बोर्ड निवडणुकीसाठी मतदान सूचना) होता. कृपया लक्षात घ्या की ज्याला हा ईमेल प्राप्त झाला नाही तो यावर्षी मतदार यादी मध्ये नाही आणि त्यांना मतपत्रिका प्राप्त होणार नाही.

मतदान सूचना ईमेलमध्ये मतपत्रिकेच्या चाचणी आवृत्तीचा दुवा आहे. कृपया पृष्ठ योग्य प्रकारे प्रदर्शित होईल आणि उमेदवार दृश्य आहेत याची खात्री करण्यासाठी त्या दुव्याचे अनुसरण करा. नसल्यास, कृपया खात्री करा की आपण ajax.googleapis.com आणि/किंवा bootstrapcdn.com वरून जावास्क्रिप्ट अवरोधित करत नाही आहात.
Read More

२०२५ OTW निवडणुकांचे उमेदवार घोषणा

उमेदवार घोषणा

OTW (परिवर्तनात्मक रसिककला मंडळी) आनंदाने आमच्या २०२५ चे उमेदवारांची घोषणा खालील प्रमाणे करू इच्छितो (पहिल्या नावाच्या अक्षर क्रमानुसार):

  • सी. रायन एस.
  • एलिझाबेथ डब्ल्यू.
  • हार्लन एल.बी.

कारण आम्हाला २ जागा भरायच्या आहेत आणि 3 उमेदवार आहेत, २०२५ वर्षाची निवडणूक स्पर्धेची असेल– म्हणजे, OTW चे सदस्य, कुठले उमेदवार जागा भरतील, या साठी मतदान करतील. Read More

२०२५ OTW निवडणुकीचे वेळापत्रक आणि सदस्यता अंतिम मुदत

संचालक मंडळाच्या नवीन सदस्यांसाठी २०२५ च्या निवडणुकांचे वेळापत्रक प्रदर्शित केल्याची घोषणा करताना OTW (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी)च्या निवडणूक समितीला आनंद होत आहे!

पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे, झिशिन झांगनी कार्यकाळ संपण्यापूर्वी संचालक मंडळाचा राजीनामा दिला आहे.
या वर्षी, खालील संचालक त्यांच्या पदाची अवधि संपल्यामुळे संचालक मंडळ सोडत आहेत:

  • Jennifer Haynes

OTW च्या संचालक मंडळावर ७ संचालक असतात आणि या वर्षी OTW सदस्य २ नवीन संचालक निवडतील, जे तीन वर्षांसाठी हे पद धरतील.

या वर्षाची निवडणूक ऑगस्ट १५-१८ ला होणार आहे. याचा अर्थ असा की कर्मचार्‍यांना आपली उमेदवारी जाहीर करण्याची अंतिम मुदत जून २० आहे.

नेहमीप्रमाणे, निवडणूक सदस्यतेची अंतिम मुदत जून ३० आहे. आपल्याला मतदान करण्याची इच्छा असल्यास, कृपया आपली सदस्यता त्या तारखेस कार्यरत असल्याचे सुनिश्चित करा. देणगी पावतीची तारीख यूटीसी वेळेप्रमाणे दिली जाते. कृपया आपल्या पावतीची तारीख तपासा. जर आपली देणगी पावती ३० जून नंतरची असेल, तर आपण मतदान करण्यास पात्र नसाल. जर आपल्याला खात्री नसेल की आपण देणगी अंतिम मुदतीच्या आधी दिली आहे वा नाही, तर कृपया आमच्या वेबसाईट वरच्या संपर्क फॉर्म हे वापरून व “माझी सदस्यता वर्तमान/मी मतदान करण्यास पात्र आहे का?” हे निवडून आमच्या अर्थपुरवठा व सदस्यता समितीशी संपर्क करा. Read More