२०२१ साठी OTW ची निवडणूक आकडेवारी

आता २०२१ ची निवडणूक संपली असल्यामुळे, आम्हाला आमची मतदानाची आकडेवारी आपल्याला सांगण्यास आनंद होत आहे!

२०२१ च्या निवडणुकीसाठी आमच्याकडे ११,२३१ पात्र मतदार होते. त्यापैकी २,३०५ मतदारांनी मतदान केले, जे संभाव्य मतदारांच्या २०.५% आहे. मागील वर्षीच्या तुलनेत आमचे यावर्षीच्या मतदार कमी आहे, ज्यांचे मतदान २१.४% होते. आम्ही टाकलेल्या मतपत्रिकांच्या संख्येत घट देखील दिसून आली; २,८५८ ते २,३०५ पर्यंत, जे १९.३% घट दर्शवते.

निवडणूक समिती, निवडणुकीत मतदान करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी, आमच्या पात्र सदस्यांशी संपर्क ठेवण्यास वचन-बद्ध आहे. ज्यांना संचालक मंडळात निवडले जाईल, त्यांचा OTW (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी) च्या प्रकल्पांच्या दीर्घकालीन हितासाठी महत्त्वपूर्ण प्रभाव असू शकतो आणि आमच्या सदस्यांनी त्यामध्ये आपले मत मांडावे, अशी आमची इच्छा आहे.

ज्यांना प्रत्येक उमेदवारास प्राप्त झालेल्या मतांच्या संख्या जाणून घेण्यामध्ये स्वारस्य आहे, त्यांनी कृपया लक्षात घ्यावे की आमची निवडणूक प्रक्रिया, बोर्ड सदस्यांना एकत्रितपणे कार्य करता यावे म्हणून त्यांचा समान गट निवडण्यासाठी योजली आहे, व त्यामुळे आम्ही ही माहिती प्रसारित करीत नाही. सामान्य नियम म्हणून, आम्ही कोणत्या असफल उमेदवारांस सर्वात कमी मते मिळाली आहेत हे देखील उघड करणार नाही, कारण भविष्यात परिस्थिती आणि सदस्यांचे रस भिन्न असू शकतात, व तेव्हा निवडणूक पुन्हा लढण्यापासून आम्ही त्यांना परावृत्त करू इच्छित नाही. तथापि, यावर्षी फक्त ४ उमेदवार होते, ज्याच्यामधून दोन निवडले गेले आणि एक नियुक्त केला गेला, म्हणून ही माहिती उघड करणे अटळ आहे.

पुन्हा एकदा, निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यात सहभागी झालेल्या प्रत्येकाचे खूप आभार! पुढच्या वर्षी पुन्हा व्हर्च्युअल पोल-मध्ये आपणांस भेटण्याची आम्ही आशा करतो.


OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदे-विषयक मदत सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन-चलित, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दाता-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाईटवर. स्वयंसेवक अनुवादकांची टीम, ज्यांनी ही पोस्ट अनुवादित केली आहे, त्यांच्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, भाषांतर पृष्ठ पहा.