संचालक मंडळ काय करते

संचालक मंडळाचे सदस्य काय करतात?

एक गट म्हणून, संचालक मंडळाच्या कर्तव्यांमध्ये अशा क्षेत्रात धोरणात्मक नियोजन आणि निर्णय घेणे समाविष्ट आहे: OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) चे ध्येय, वार्षिक बजेट, प्रकल्प आणि प्राधान्यक्रम; संस्थेसाठी दीर्घकालीन लक्ष केंद्रित करणे; धोरणात्मक लक्ष्याचे प्रगतीवर लक्ष ठेवणे; संस्थात्मक कायदेशीर अनुपालन निश्चित करणे; संस्थात्मक क्रियांची जबाबदारी घेणे; संस्थेची कायदेशीर जबाबदारी घेणे आणि त्यासंबंधी IRS सह वित्त; आणि करारावर सही करणे, निधी वितरित करणे, विविध प्रकारचे व्यवहार करणे.

वैयक्तिकपणे, बोर्डाच्या सदस्यांनी गप्पा-आधारित बैठकीत उपस्थित राहणे, संबंधित संस्थात्मक संप्रेषण आणि अहवाल यांमध्ये अद्यतनीत राहणे, आणि OTWच्या चांगल्या हितासाठी चांगल्या विश्वासाने कार्य करणे अपेक्षित आहे.