वर्ष २०२१ मतदान विषयक सूचना

OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) २०२१ मंडळाच्या संचालक पदाची निवडणूक ऑगस्ट १३-१६ या दिवशी आयोजित केली जाईल. मतदान ऑगस्ट १३ या दिवशी रात्री १२.०१ वाजता UTC खुले होईल व ऑगस्ट १६ ला रात्री ११.५९ वाजता UTC बंद होईल (माझ्यासाठी ती काय वेळ असेल?). तुम्ही या काळात उपलब्ध नसाल तर कृपया तुमचे प्रतिनिधित्व करण्यास इच्छुक व्यक्तीस शोधा व निवडणूक समितीशी रात्री ११.५९ UTC ऑगस्ट ३ या आधी संपर्क करा व तुमच्या प्रतिनिधी चा ई-मेल अड्रेस पाठवा माझ्यासाठी ती काय वेळ असेल?). तुमच्या प्रतिनिधी विनंत्या या मार्गाने पाठवा संपर्क फाॅर्म.

या वर्षी निवडणूकांची व्यवस्था करण्यासाठी आम्ही ओपावोट ह्या साॅफ्टवेर ची सेवा वापरत आहोत. जेव्हा निवडणूक चालू होईल, तुम्हाला opavote.com कडून ई-मेल मिळेल. ती तुम्हाला मतपत्रिकेच्या आगळ्या URL कडे दर्शित करेल. मतदान होई पर्यंत ई-मेल जपून ठेवा कारण निवडणूक समिती कडे मतपत्रिका स्वहस्ते पुन्हा पाठवण्याची क्षमता नाही. opavote.com डोमेन तुमच्या सुरक्षित प्रेषकांच्या यादी मध्ये घाला म्हणजे पाठवलेली ई-मेल स्पॅम फोल्डर मध्ये जाणार नाही.

मतदानाच्या सूचनेच्या ई-मेल मध्ये मतपत्रिकेच्या चाचणी आवृत्तीची दुवा असेल. त्या दुवेवर जाऊन, पृष्ठ प्रदर्शन बरोबर आहे व सर्व उमेदवार दृश्य आहेत याची खात्री करून घ्या. जर तसे नसेल तर तुम्ही ajax.googleapis.com, bootstrapcdn.com, and/or opavote.com या मधून JavaScript ब्लाॅक करत नाही याची खात्री करून घ्या.

मतपत्रिका उघडल्यावर सूचना वाचून घ्या. जर तुम्ही या आधी Instant Runoff Voting (IRV) (झटपट अपवाह मतदान) ही पद्धत वापरून मतदान केले नसेल तर कृपया मतदान करण्या आधी IRV कसे कार्य करते या बद्दल वाचा

पृष्ठाच्या डाव्या भागात उमेदवार प्रदर्शित केले जातील. उमेदवाराच्या नावाच्या शेजारील ADD (भरा) बटण निवडा ज्यानी त्यांची नावे तुमच्या वैयक्तिक मतपत्रिकेत तुमच्या प्राधान्यानुसार अनुक्रमित केले जातील. पहिल्या निवडीला सर्वात जास्त प्राधान्य, दुसरा मागोमागचा सर्वोत्तम, वगैरे. उमेदवारांना भरल्यावर त्यांचा अनुक्रम तुम्ही त्यांचे नाव ड्रॅग आणि ड्राॅप करून बदलू शकता, किंवा त्यांची नावे REMOVE (काढा) व ADD बटण वापरून काढू व परत भरू शकता.

वैध मतपत्रिका पाठवण्यासाठी तुम्हाला एका तरी उमेदवाराचे नाव भरावे लागेल. जेव्हा तुम्ही मत देण्यास इच्छुक सर्व उमेदवारांची क्रमवारी पूर्ण केली असेल, मतपत्रिका पाठवण्यासाठी Vote (मत द्या) बटणावर क्लिक करा. मत रद्द किंवा परत पाठवता येऊ शकत नाही. अजून तपशिलांसाठी हे बघा मतदाना विषयी माहिती.

तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला काही तांत्रिक अडचण जाणवल्यास, निवडणूक समितीशी या मार्फत संपर्क करा संपर्क फाॅर्म. कृपया ड्राॅप-डाऊन मेनु मधून “voting issues(मतदान विषयक)” निवडा.

OTW निवडणूकांमध्ये मतदान करण्याबद्दल धन्यवाद!