लौरे डौबन चे जीवनचरित्र व व्यासपीठ

जीवनचरित्र

लौरे डौबन ने भाषांतराच्या शिक्षणानंतर बऱ्याच नोकऱ्या बदलल्या आहेत. तिने प्रकाशन, विडिओ गेम्स, काही काळासाठी फॅशन, मुद्रणालय आणि तांत्रिक आधार येथे काम केले आहे. पुरेशी विविधता नसल्याने आत्ताच्या घडिला ती फ्रान्स मध्ये परत वेब डेव्हलपर बनण्यासाठी शिकत आहे.

लौरे ला आता नक्की आठवतही नाही की तिने रसिककथांचा शोध कधी लावला, पण तिचे Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) खाते सांगते की ती तिथे २०१३ पासून आहे. ती पुरेसं मार्दव्य, चिंता आणि प्रणय असलेल्या कुठल्याही रसिकगटात वाचन करू शकते, ते सगळे एकत्र असेल तर अजूनच उत्तम.

ती मे २०१९ मध्ये OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) ला फ्रेंच अनुवादक म्हणून सामील झाली, ६ महिन्यांनंतर भाषांतर समितीमध्ये स्वयंसेवक व्यवस्थापक म्हणून पेरली गेली. हे झाल्यामुळे तिला इतर समित्यांशी संवाद साधायला तर मिळालाच पण स्वतःच्या कथा सुरु करण्याचेही प्रोत्साहन मिळाले.

व्यासपीठ

१. आपण बोर्डाच्या निवडणुकीत लढण्याचा निर्णय का घेतलात?

भाषांतर समितीसाठी स्वयंसेवक व्यवस्थापक असणे हे खूप चित्तवेधक आहे, व त्यामुळे मी OTW आणि रसिकगटाबद्दल खूप काही समजून घेणे शक्य झाले आहे आणि मला अजूनही शिकायला आवडेल. मला असे वाटते की या सारख्या संस्थेमध्ये बोर्डावर असणे आणि पूर्वव्यापी चित्र बघणे लक्षवेधक असेल.

मागील वर्षात मला हे सुद्धा कळून चुकले आहे की अशी रचना चालवणे हे किती क्लिष्ट काम आहे, आणि मला या प्रक्रियेस मदत करायला व कुठल्याना कुठल्या पद्धतीने योगदान करायला आवडेल.

२. आपण बोर्डामध्ये कोणती कौशल्ये आणि/किंवा अनुभव आणता?

माझी मुख्य कौशल्ये अनुकूलन क्षमता, सहानुभूती, आणि सहकार्य आहेत.

माझ्या पहिल्या शिक्षणामध्ये मी अनुकूलनक्षमता विकसित केली. अनुवाद हा स्वतःच खूप अष्टपैलू अभ्यास आहे, आणि म्हणूनच मला त्याची आवड आहे. हे एक असे कौशल्य आहे जे प्रत्येक वेळी नोकरी बदलताना मला उपयोगी ठरले आहे, नवीन वातावरणात मी पटकन शिकते व बहुतकरून जलद कार्यरत होते.

सहानुभूतीही सुद्धा शिकण्याची गोष्ट आहे व मला ती आधीच शिकण्याची संधी मिळाली. प्रेमळ लोकांबरोबर आधी काम व नंतर स्वयंसेवा करणे मला खूप काही शिकवून गेले, व मुख्यत्वे तो प्रेमळपणा दृढ राहण्यासाठी तो कार्य-प्रक्रियांमध्ये मिसळलेला असणं गरजेचे आहे. मी पुरेसे विषजन्य वातावरण बघितले आहे की आता मला पक्के माहित आहे की एक व्यवस्थापक म्हणून काय करू नये.

सहकार्य सुद्धा मी वर्षानुवर्षात शिकले, आणि OTW मध्ये ते विशेषतः महत्वाचे आहे, जिथे बहुतकरून कार्य एकत्र संघांमध्ये केले जाते.

३. OTW साठी महत्वाची असलेली एक किंवा दोन ध्येय निवडा ज्यावर आपल्याला आपल्या सत्रात काम करण्यास आवडेल. आपल्याला ही ध्येय मोलाची का वाटतात? आपण इतरांसोबत काम करून ती पूर्ण कशी कराल?

माझ्यासाठी पाहिले मौल्यवान ध्येय हे OTW चे प्रकल्प जास्तीत जास्त लोकांना उपलब्ध करणे आहे. मी आत्ताही या द्यायच्या भाषांतर बाजूस काम करते, आणि मी ते चालू ठेवणार आहे. मी AO3 वेबसाईट वर कार्य करणाऱ्या उपलब्धता, आखणी आणि तंत्रज्ञान समितीस सुद्धा आधार देणार आहे. आपण जेवढे शक्य असेल तेवढे अगत्यशील असणे हे माझ्यासाठी आपल्या मिशन चा एक खूप महत्वाचा भाग आहे.

मला विविध समित्यांना एकत्र कार्य करण्यासाठी मदत करावयासही आवडेल. OTW हे एक मोठे यंत्र आहे, आणि त्याचे सर्व भाग सहजपणे एकत्र काम करणे हा एक अविरत प्रयत्न आहे. वेगवेगळ्या समित्यांचे मुख्य त्यांच्या कार्याकडे कसे कुठला दृष्टिकोन ठेवतात हे बघण्यात व त्यांना मदत लागल्यास तिथे असणे यात मला खूप रस आहे.

४. OTW च्या प्रकल्पांसंदर्भात आपला अनुभव कसा होता आणि संदर्भित समित्यांसोबत सहयोगाने कार्य करून आपण त्यांना सहाय्य आणि बळकट कसे कराल? विविध प्रकल्प सामिल करण्याचा प्रयत्न करा, पण आपल्याला ज्यांसोबत अनुभव आहे त्या विशेष प्रकल्पांवर मुक्तपणे भर द्या.

OTW मध्ये नवीन असल्यामुळे, मी आत्तापर्यंत फक्त भाषांतर समितीचा भाग होते. सुदैवाने, ही अशी समिती आहे जी इतर अनेकांबरोबर संपर्कात असते, कारण आम्ही विविध स्तराची कागदपत्रे अनुवादित करतो.यामुळे मला भाषांतरासाठी इतर समित्यांबरोबर सहयोग करणे, आणि त्यांच्या मध्ये त्यांचे स्वतःचे तपशील आणि मुद्दे आहेत हे बघणे शक्य झाले.

त्याचा अर्थ असा की मी AO3, फनलोर, Open Doors (मुक्तद्वार) आणि कायदेविषयक समितीसाठी खूप वाचन केले आहे. AO3 आपला सर्वात सुप्रसिद्ध प्रकल्प नक्कीच आहे, पण याचा अर्थ असा नाही की इतर प्रकल्प दुर्लक्षित राहिले जातील. मला खूप छान वाटते की आपण मुक्तद्वारातर्फे धोक्यात असलेले मजकूर जतन करण्यामध्ये, आणि फनलोर मध्ये रसिकगटांचा इतिहास नमूद करण्यामध्ये योगदान देतो.

५. आपण आपले बोर्डाचे कार्य व OTW मधील इतर भुमिका यांचा समतोल कसा साधाल, किंवा बोर्डाच्या कामावर लक्ष केंद्रित करण्याकरीता आपण आपल्या सद्यकालीन भुमिका हस्तांतरीत कशा प्रकारे कराल?

मध्ये भाषांतर समितीने काही नवीन स्वयंसेवक व्यवस्थापक गोळा केले आहेत, व त्यामुळे आमच्याकडे कर्मचार्यांची अजिबात कमी नाही. समितीमध्ये माझे सद्ध्याचे काम सद्ध्याही खूप वाजवी आणि लवचीक आहे, म्हणून प्राधान्यानुसार फक्त मला माझा वेळ व्यवस्थापित आणि त्या मध्ये फेरफार करावी लागेल.

बोर्डाच्या निर्णयांना अर्थातच प्राधान्य असेल, तसेच OTW वर परिणाम करणाऱ्या कुठल्या संकटाला ही. तरीही मी भाषांतर समितीसाठी स्वयंसेवा करणे सोडणार नाही कारण त्यामुळे मला खूप समाधान मिळते आणि समितीसाठी अनेक व्यवस्थापक उपलब्ध असणे मदतीचे असते!