OTW बोर्डाच्या निवडणूका घेण्याची जबाबदारी निवडणूक समिती कडे असते. मध्य २०१४ मध्ये निवडणूका OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) बोर्डा मधून बाहेर पडून वेगळी स्थापित झालेली ही समिती, आम्ही प्रामाणिकपणा, वेळ पाळणे व निवडणुकांच्या गोपनियतेवर भर देतो. संघ म्हणून आम्ही कार्यपद्धती अद्यतनीत करतो, OTW च्या व इतर समित्यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधतो, उमेदवारांना कार्य तयार आणि पूर्ण करण्यास मदत करतो, आणि निवडणूका चालवतो.
समितीचे सर्व सदस्य संघ वातावरणाचे पालन करण्यासाठी एकत्र काम करून विशिष्ट प्रकल्प पूर्ण करीत असले तरी, आपले कर्मचारी पाच विशिष्ट जागांची पूर्तता करतात. त्या खालील प्रमाणे आहेत :
उमेदवार संपर्काधिकारी
उमेदवार संपर्काधिकारी निवडणुकीतील उमेदवारांच्या पोहोच व समर्थनासाठी जबाबदार असतात. ते थेट उमेदवारांबरोबर काम करून त्यांना उमेदवारी घोषणा व निवडणूक प्रक्रिये दरम्यान मार्गदर्शन करतात.
संवाद विशेषज्ञ
संवाद विशेषज्ञ हे समितीचे मूख्य लेखक व संपादक आहेत. ते जाहीर बातम्यांच्या पोस्ट व अंतर्गत घोषणा तयार करतात, व तसेच समितीची कागदपत्रे लिहिण्यास व संपादित करण्यास मदत करतात.
संघ समन्वयक
संघ समन्वयक हे समिती मधील सर्व प्रशासकीय व संघटनात्मक गोष्टींबाबत जबाबदार असतात. ते कार्यपद्धती बनवतात, भरती चालवतात, बैठकींची वेळापत्रक बनवतात, प्रकल्पांचे नियोजन करण्यात सहाय्य करतात व समितीची कागदपत्रे सांभाळतात.
मतदान प्रक्रिया स्थपती
मतदान प्रक्रिया स्थपती आपली मतदान प्रक्रिया व साॅफ्टवेअर बनवितात आणि सांभाळतात. छेडछाडीचा धोका कमी करण्यासाठी ते समितीच्या निवडणुक प्रक्रिया तयार करतात, अद्यतनित करतात व पडताळतात. मतदार व उमेदवारांची गोपनीयता व मतदान प्रक्रियेची अखंडता जतन करण्यासाठी ते समितीस योग्य रणनिती चा सल्ला देतात.
अध्यक्षस्थान वाट कर्मचारी
अध्यक्षस्थान वाट कर्मचारी, अध्यक्षस्थान जागेच्या तयारीसाठी असलेल्या समितीच्या उपक्रमांवर लक्ष ठेवतात. इतर समिती सदस्यांची सावली होऊन व त्यांचे उपक्रम पूर्ण करण्यात त्यांना मदत करून ते सहा महिने सर्वांच्या भूमिका समजून घेतात.
जर आपल्याला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल किंवा आमच्या संघात सामिल होण्यास इच्छुक असाल तर, आम्हाला इथे संपर्क करा!