निवडणूक प्रक्रिया वर्तन आपेक्षा

खुल्या, अगत्यशील, व सकारात्मक मतदान प्रक्रियेस प्रोत्साहन करण्यासाठी, निवडणूक समिती विनंती करते की उमेदवार, स्वयंसेवक, व सदस्य हे औपचारिक
मतदान क्रियाकलापां दरम्यान या सोप्या अपेक्षा पाळतील:

  • शारिरिक वा मानसिक अपंगाशी जुडलेल्या शब्दांसह, सर्व निंदेचे शब्द टाळा.
  • लैंगिक-तटस्थतेचा आणि/किंवा सर्वनाम प्राधान्याचा आदर करा.
  • उमेदवाराचे वागणे/बोल यां बद्दल बोला, त्या व्यक्ती बद्दल नाही. उदाहरणार्थ: “क्ष व्यक्ती बेबनाव आहे” हे म्हणण्या ऐवजी, “क्ष व्यक्तीने ही शंका अभिभाषित केली नाही” हे म्हणा.
  • OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) ची साधने/प्रवेश यांचा वापर, कोणत्याही स्वयंसेवक, सदस्य वा उमेदवारास त्रास देण्यास, मागे पडण्यास किंवा धमकी देण्यास वापरू नका, वा दुसऱ्या कोणाला असे करण्याची विनंती सुद्धा करू नका.
  • ज्यांच्यावर तुमचा अधिकार असेल अशा कोणत्याही उमेदवाराच्या उमेदवारी मध्ये हस्तक्षेप करू नका.
  • कोणाचीही व्यक्तिगत माहिती फोडणे टाळा. म्हणजे रसिक पात्र, OTW मध्ये वापरले जाणारे नाव, आणि/किंवा कायदेशीर नाव (किंवा कुठलिही कृती जी या नावांशी जुळली जाऊ शकेल) त्या व्यक्तिच्या स्पष्ट परवानगी शिवाय एकमेकांशी जोडणे टाळा. माहिती फोडण्याचा परिणाम मतदानाचा विशेषाधिकार जप्त करण्यामध्ये किंवा उमेदवाराच्या बाबतीत त्यांना मतपत्रिकेतून काढून टाकण्यामध्ये होईल.
  • कोणालाही पैसे, रसिक-कार्य, किंवा इतर कशाचीही लाच देऊ नका. लाच देण्याचा परिणाम सुद्धा मतदानाचा विशेषाधिकार जप्त करण्यामध्ये किंवा मतपत्रिकेतून काढून टाकण्यामध्ये होईल.