निवडणुकांचे वेळापत्रक २०२१

सन २०२१ चे हे अधिकृत निवडणुकांचे वेळापत्रक आहे. प्रश्न आणि उत्तरे कालावधी आणि उमेदवारांसह लाइव्ह चॅट्स यासारखे काही निवडणुकांचे कार्यक्रम केवळ इंग्रजीमध्ये उपलब्ध असणार आहेत. तुम्हाला याविषयी अधिक माहिती हवी असल्यास, कृपया या पृष्ठाच्या डावीकडील भाषांच्या सूचीमधून “इंग्रजी” निवडून या काळरेषेची इंग्रजी आवृत्ती पहा.

जून १८

 • उमेदवारांची अंतिम मुदत रात्री ११:५९ UTC आहे. यावेळापूर्वी उमेदवारांनी OTW (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी) चे सदस्य होणे आवश्यक आहे.
 • उमेदवार बायो आणि प्लॅटफॉर्मची निवडणूक समितीकडे सादर करण्याची अंतिम मुदत रात्री ९९:५९ UTC आहे. जर विधाने भाषांतरित असतील तर उशीरा दिलेल्या विधानांचे भाषांतर शेवटी केले जाईल.

जून २०

 • उमेदवार सार्वजनिकरित्या जाहीर केले जातात आणि बायोज व प्लॅटफॉर्म प्रकाशित केले जातात.

जून ३०

 • सभासद होण्याची अंतिम मुदत, जेणेकरून आगामी निवडणुकीत आपण मतदान करू शकता.
 • असे कोणीही जे जुलै १, २०२० व जून ३०, २०२१ च्या दरम्यान सदस्य झाले असतील, दोन्ही UTC तारखा धरून, ते या निवडणुकीत मतदान करण्यास पात्र ठरतील. कृपया नोंद असुद्या की आपल्या देणगी पावती वर US पूर्व वेळेप्रमाणे तारीख असेल, व जर आपली देणगी पावती ३० जून २०२१ १९.५९ नंतर नोंद झाली असेल, तर आपण मतदान करण्यास पात्र नसाल. जर आपल्याला खात्री नसेल की आपण देणगी अंतिम मुदतीच्या आधी दिली आहे वा नाही, तर कृपया आमच्या वेबसाईट वरच्या संपर्क फॉर्म हे वापरून व “माझी सदस्यता वर्तमान/मी मतदान करण्यास पात्र आहे का?” हे निवडून आमच्या अर्थपुरवठा व सदस्यता समितीशी संपर्क करा.

जुलै २४

 • पात्र मतदारांना ईमेलद्वारे पाठविलेल्या मतदार सूचना.

ॲागस्ट ३

 • आपण संपूर्ण निवडणूक कालावधीसाठी ईमेलपासून दूर असल्यास तर प्रॉक्सी विनंतीसह निवडणूक समितीशी संपर्क साधण्याची ही अंतिम मुदत आहे.

ऑगस्ट १३-१६

 • शुक्रवारी सकाळी १२:०१ UTC ते सोमवारी रात्री ११:५९ UTC पर्यंत निवडणूक होणार आहे.

ऑगस्ट १७

 • निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल.

ऑगस्ट २४

 • पुन: गणना विनंतीसाठी अंतिम मुदत.

ऑक्टोबर १

 • बोर्ड उलाढालीची सुरुवात

मागील वर्षांच्या टाइमलाइन इतिहास पृष्ठावर मिळतील.