केरी डेटनचे जीवनचरित्र आणि व्यासपीठ

जीवनचरित्र

Sailor Moon (नाविक चंद्र) मार्गे फारच लहान वयात केरी डेटन (ती / तिची) यांना प्रथम रसिकगट सापडले, पण तिला Harry Potter (हॅरी पॉटर) रसिकगटामध्ये रसिककथा सापडण्यास अजून बरीच वर्षे होती. (ट्रान्स अधिकारवर तिचा ठाम विश्वास आहे आणि Harry Potter (हॅरी पॉटर) फॅन्डमला लेखाखाच्या द्वेषपूर्ण व्हिट्रिओलपासून दूर करण्यासाठी केले गेलेले कार्य तिला आवडते.) तिच्या मनात अनेक कल्पना आहेत, तरीही तिने जास्त रसिककथा लिहिल्या नाहीत आणि टाचणखूण संपादक म्हणून पडद्यामागे काम करण्यास प्राधान्य दिले, ती या समिती मध्ये २०१८ साली सामील झाली. ती एक सक्रिय टाचणखूण संपादक पर्यवेक्षक आहे (२०१९ पासून), आणि प्रशासकीय कामात मदत करणारी आणि टाचणखूण संपादकांचे जीवन सुलभ करण्यासाठी विचारमंथनाचा आनंद घेते.

दिवसा, ती एका VoIP संगतीत तंत्रज्ञान कंपनी मध्ये काम करते आणि ती तिच्या विभागासाठी मुख्य अंतर्गत प्रशिक्षण आणि तांत्रिक नेतृत्व करते. तिच्या दिवसाच्या नोकरीमध्ये कागदपत्रे लिहिणे आणि अद्यतनित करणे, तिच्या विभागातील आणि संबंधित विभागातील सहकर्मींसाठी माहितीस्रोत असणे, प्रश्नांची उत्तरे देणे (टेक्स्ट आणि ईमेलद्वारे) आणि नवीन लोकांना प्रशिक्षण देणे समाविष्ट आहे. ती तिच्या कंपनीत विभागांना सहकार्य करण्यासाठी, विभागांमधील संवाद सुलभ करण्यासाठी आणि गोष्टी माहित असलेली व्यक्ती म्हणून ओळखली जाते, आणि तिला वाटते की माहिती भंडार हे सर्वांसाठीच बिनकामाचे आहेत. ज्याबद्दल आपल्याला अधिक जाणून घेणे इच्छित आहे अशा कोणत्याही कार्याबद्दल प्रशिक्षण देऊन तिला आनंद होईल – फक्त सांगा!

व्यासपीठ

१. आपण बोर्डाच्या निवडणुकीत लढण्याचा निर्णय का घेतलात?

मी काही कारणांमुळे लढण्याचा निर्णय घेतला. देणग्या आणि स्वयंसेवा करण्याच्या बाबतीत मी सध्या जे काही करते त्यापलीकडे OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) ला मदत करणे ही एक मुख्य प्रेरणा आहे. OTW काय करते आणि कशासाठी करते यावर माझा खरोखर विश्वास आहे आणि माझा वेळ, पैसे आणि माझ्या दृष्टीने महत्त्वपूर्ण कामांसाठी प्रयत्न करणे यावर माझा विश्वास आहे.

हलक्या-फुलक्या पद्धतीने सांगायचे तर, मी एक जिज्ञासू व्यक्ती आहे जी प्रत्येकजण काय कार्य करत आहेत आणि संपूर्ण कार्याचे भाग एकत्र कसे कार्य करत आहेत, हे मला माहित करून मी सर्वोत्कृष्ट कार्य करते, त्यामुळे बोर्डासाठी लढणे हे पुढचे तर्कशुद्ध पाऊल वाटतं! मला “मोठे चित्र” समजून घेण्यास आवडते जेणेकरून मी माझ्या भूमिकेस चांगल्या प्रकारे समजू शकते.

शेवटी, मला खात्री करायची आहे की आपल्या आपत्कालीन उमेदवारांना लढण्याची आवश्यकता कमी करण्यासाठी आमच्याकडे पुरेसे उमेदवार असतील. मी गेल्या वर्षी लढण्याचा विचार केला होता परंतु माझ्या वैयक्तिक आयुष्यातला तो खूप त्रासदायक काळ होता म्हणून मी शेवटी त्याविरुद्ध निर्णय घेतला. ह्या वर्षी लढण्यासाठी अजून एक प्रेरणादायक कारण आहे कि माझ्या अनेक OTW मधील मित्रांना वाटले की मी बोर्डासाठी एक योग्य उमेदवार आहे!

२. आपण बोर्डामध्ये कोणती कौशल्ये आणि/किंवा अनुभव आणता?

OTW च्या बाजूने, मी बरेच टाचणखूण संपादनचे अनुभव (तीन वर्ष संपादन करण्याचे आणि दोन वर्ष देखरेखीच्या स्वरूपात) आणि जवळजवळ सहा महिन्यांचा समिती-संवाद समिती अनुभव आणले आहेत. OTW साठी स्वयंसेवा केल्यामुळे मला जे लोक इंग्रजी प्रथम भाषा म्हणून बोलत नाही त्यांच्याशी अधिक स्पष्टपणे आणि प्रभावीपणे कसे संवाद साधता येईल, दूरस्थपणे कसे कार्य करावे आणि जगभरातील लोकांसह सहयोग कसे करावे हे शिकण्यास मला मदत केली आहे.

माझ्या पगाराच्या नोकरीच्या बरोबर, मी वेगवेगळ्या संस्कृतींसह काम करण्याचा आणखी अनुभव, नेतृत्व अनुभव (अधिकृतपणे आणि अनधिकृतपणे दोन्ही), संघटनात्मक अनुभव (ग्रंथालय, अभ्यासक्रम विकास, दस्तऐवजीकरण), आणि भिन्न गटांसह जवळून कार्य करण्याचा अनुभव आणते ज्याची वेगवेगळी लक्ष्य असू शकतात.

काही समजले नाही किंवा मला अधिक स्पष्टीकरण हवे असेल तेव्हा बोलण्यास मला भीती वाटत नाही; मला एखाद्या प्रश्नाचे उत्तर असणारी, लवकर प्रश्नाचे उत्तर शोधण्यात किंवा प्रश्नाचे उत्तर देऊ शकणारी एखादी व्यक्ती शोधण्यात चांगली असलेली म्हणून ओळखले जाते.

३. OTW साठी महत्वाची असलेली एक किंवा दोन ध्येय निवडा ज्यावर आपल्याला आपल्या सत्रात काम करण्यास आवडेल. आपल्याला ही ध्येय मोलाची का वाटतात? आपण इतरांसोबत काम करून ती पूर्ण कशी कराल?

माझे पहिले मुख्य ध्येय OTW संघातील दुर्लक्षित लोकांचे आवाज वाढविणे हे आहे. आम्ही दुर्लक्षित लोकांच्या सुखसोयीसाठी आणि OTW सुधारण्यास मदत करण्यासाठी त्यांचे ,म्हणणे ऐकत आहोत आणि बदल करीत आहोत, हे सुनिश्चित करणे महत्वाचे आहे असे मला वाटते. माझ्या अनुभवामध्ये, OTW ऐकुणात लोकांना जाणून घेण्यामध्ये चांगले आहे – परंतु मला वाटते की ते (बर्‍याच इतर संस्थांप्रमाणे) अधिक चांगले होऊ शकते. या ध्येयाचा सर्वात कठीण भाग म्हणजे OTW मधील लोकांना शोधणे जे (स्वतःला दुर्लक्षित म्हणून ओळखणारे) त्यांच्या अनुभवाबद्दल बोलण्यास इच्छुक आहेत . मी यावर उपाय शोधण्याच्या दिशेने कार्य करण्यास उत्सुक आहे – हे एक दुर्लक्षित व्यक्ती म्हणून माझ्या दृष्टीने महत्वाचा आहे, जिचे प्रेमाचे बरेच लोक आहेत जे दुर्लक्षित आहेत. विशेषाधिकारांचे विस्मरण करताना (जेवढे मला शक्य आहे तेवढे) माझ्या कार्याचा एक भाग म्हणून हे ही खूप महत्त्वाचे आहे. ज्यांचा आवाज ऐकले जात नाही किंवा ज्यांना वाटते कि आपल्याला सामिल केले जात नाही, त्यांचे आवाज वाढवणे हे एक खूपच महत्वाचे (पण कठीण) लक्ष्य आहे – परंतु मला वाटते की हे उचलून धरणे आपल्यासाठी (OTW साठी) मौल्यवान आहे.

OTW अंतर्गत अधिक मुक्त संप्रेषणास प्रोत्साहन करणे हे माझे दुसरे मुख्य लक्ष्य आहे. आमच्याकडे नियमित वृत्तपत्र असते आणि मंडळाकडे एक निनावी अभिप्राय फॉर्म असतो, परंतु समित्यांमध्ये तसेच त्यांच्या अंतर्गतही अधिक दृश्यमानतेसाठी प्रोत्साहित करण्यासाठी मी अधिक पर्याय शोधू इच्छित आहे.

४. OTW च्या प्रकल्पांसंदर्भात आपला अनुभव कसा होता आणि संदर्भित समित्यांसोबत सहयोगाने कार्य करून आपण त्यांना सहाय्य आणि बळकट कसे कराल? विविध प्रकल्प सामिल करण्याचा प्रयत्न करा, पण आपल्याला ज्यांसोबत अनुभव आहे त्या विशेष प्रकल्पांवर मुक्तपणे भर द्या.

मी प्रामुख्याने Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) बरोबर परिचित आहे (टाचणखूण संपादक म्हणून माझ्या कार्याद्वारे), परंतु माझ्याकडे फॅनलोर (वैयक्तिक वापर) आणि Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प) (टाचणखूण मॅपिंग आणि उत्साहपूर्ण समर्थन) देखील अनुभव आहेत.

अंतर्गत (OTW अंतर्गत) किंवा बाहेरून, स्वयंसेवकांना दृश्यमानता वाढविण्याचे मार्ग शोधण्यात त्यांना रस आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी मला रसिकाभ्यास मंडळ आणि Transformative Works and Cultures – TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) सारख्या कमी-ज्ञात प्रकल्पांशी संभाषण करायला आवडेल. उदाहरणार्थ, मला माहित आहे की फॅनलोर वर्षभर अनेक मजेदार क्रियाकलाप चालवते; कदाचित इतर समित्यांनाही अशाच काही गोष्टींमध्ये रस असेल? अर्थात येथे महत्वाचा मुद्दा समित्यांपर्यंत पोहचणे आहे, हे जाणून घेण्यासाठी की असे काही प्रकल्प घेण्याबद्दल त्यांना काय वाटते आणि ते इच्छुक असल्यास त्यांना पाठिंबा देणे.

जेव्हा मला प्रश्न किंवा समस्या उद्भवतात तेव्हा इतर प्रकल्पांबद्दल अधिक वैयक्तिकरित्या ज्ञानी होण्यासाठी मला अधिक जाणून घ्यायचे आहे. मला इतर प्रकल्पांबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे ज्यांचा माझ्याशी त्वरित संपर्क नाही, कारण यामुळे मला OTWला समजण्यास आणि मदत करण्यास मदत होईल.

मला इतर कमी-ज्ञात प्रकल्पांबद्दल शिकण्याबद्दल उत्सुकता असूनही, टाचणखूण समिती, नियम आणि तक्रारनिवारण समिती, समिती-संवाद समिती आणि भाषांतर समिती यासारख्या अधिक दृश्यमान अंतर्गत समित्यांना पाठिंबा देण्यास मी वचनबद्ध आहे. मला आढळले आहे की टिप्पण्या आमंत्रित करून आणि प्रतिक्रियांना ऐकून आपण बरेच काही करू शकता – मला या समित्या व इतरांशी बोलण्यास आणि त्यांचे वेदना बिंदू कुठे आहेत हे शिकण्यास आणि समर्थन देण्यासाठी आवडेल.

५. आपण आपले बोर्डाचे कार्य व OTW मधील इतर भुमिका यांचा समतोल कसा साधाल, किंवा बोर्डाच्या कामावर लक्ष केंद्रित करण्याकरीता आपण आपल्या सद्यकालीन भुमिका हस्तांतरीत कशा प्रकारे कराल?

माझी सध्याची भूमिका सोडण्याची माझी कोणतीही योजना नाही, कारण जर मला माझ्या सध्याच्या काही कामे कमी करण्याची आवश्यकता असल्यास, टाचणखूण समितीचा पर्यवेक्षक संघ इतका मोठा आहे कि ते मला पाठिंबा देऊ शकतात. माझे टाचणखूण संपादनचे काम कमी करण्याचीही माझी कोणतीही योजना नाही, कारण ते लहान-लहान भागात केले जाऊ शकते. तथापि, मला बोर्ड-संबंधित कामांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता वाटल्यास मी संपादन करत असलेल्या रसिकगटांची संख्या कमी करू शकते.