जीवनचरित्र
एनटोनियस मेलीसे नेदरलँडस मधनं असा माणूस आहे ज्याचा हा ठाम विश्वास आहे की माणसाने कधीच नव्या गोष्टी शिकणे थांबवायला नाही पाहिजे. त्याला बरीच प्रमाणपत्रे मिळाली आहेत, विद्यापीठात आणि अन्यथा, इंग्रजी भाषा व साहित्य, पत्रकारिता, सॉफ्टवेअर चाचणी चे दोन प्रकार (ISTQB आणि TMAP Next) आणि PHP विकास मध्ये. आत्ता तो Symfony बॅक-एंड विकसक म्हणून काम करतो आहे.
मागील व्यवस्थापन अनुभवाबद्दल सांगायचे तर, तो एका संगीत-नाट्य गटा मध्ये होता (बास म्हणून गाताना), तेव्हा तो त्यांचा एक बोर्ड सदस्य पण होता, आणि त्याने एक व्यवस्थापन नोकरी पण केली होती ज्याच्यात उन्हाळ्यात नोकरी शोधणार्या विद्यार्थ्यांचा तो प्रभारी होता.
त्याला रसिकगटाची ओळख त्याच्या काही दीर्घकालीन मित्रांनी करून दिली, ज्यांच्यासोबत तो World of Warcraft (युद्धकौशल्याचं जग) खेळायचा. एकत्र ते आपल्या गिल्ड च्या मंचावर कथा आणि मूळ गोष्टीं लिहायचे. जेव्हा एका मित्राने उल्लेख केला की ते OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) साठी काही वेळापासून भाषांतर करत आहेत आणि डच भाषा संघा मध्ये एक जागा रिकामी झाली आहे, त्याने ही संधी घेतली आणि तो फेब्रुवरी २०१६ पासून भाषांतर समितीचा भाग आहे. तो काही काळ नियम आणि तक्रारनिवारण समितीच्या कामातही सहभागी झाला आहे.
सध्या, तो अनेक वेळी थोड्या रसिकध्वनिफीती बनवतो, सहसा The Witcherसाठी, परंतु त्याला सर्वच कल्पनारम्य आणि वैज्ञानिक कल्पनांच्या रसिक गटांचे कौतुक वाटते.
व्यासपीठ
१. आपण बोर्डाच्या निवडणुकीत लढण्याचा निर्णय का घेतलात?
जेव्हा पासून मी भाषांतर समिती मध्ये सामील झालो आहे, मला असं वाटतं की मी OTW च्या मध्ये आणि आसपास खूप साऱ्या नव्या लोकांना भेटलो आहे, आणि ते एकत्र खूप विविध आणि मनोरंजक गट तयार करतात. हा समुदाय जोपासण्यासाठी खूपच मूल्यवान आहे. माझ्याकडे वेळ आणि उत्साह असल्याने मी या समुदायामधल्या आश्चर्यकारक आणि वैविध्यपूर्ण लोकांना अर्थपूर्ण मार्गाने योगदान देऊ शकतो, हे माझ्या लढण्याचा पहिलं कारण आहे.
ह्या ऐवजी, Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) वरती लोकांचे खाते आणि सादर केलेल्या कार्यांची संख्या सतत वाढत आहे, म्हणूनच हे अत्यंत महत्वाचे आहे की आम्ही अशी जागा उपलब्ध करून देऊ जिकडे लोकं हे करू शकतात, आणि जिकडे रासिककृत्या जपून ठेवल्या जाऊ शकतात. ह्या कारणासाठी, आम्ही एक संघटना म्हणून जे करतो, ती कामे करणे महत्वाचे आहे, आणि जिकडे शक्य असेल तिकडे, सुधार करणेही. हे घटक विचारात घेता व मी आत्ता पर्यन्त आयुष्यात जेवढी कौशल्ये आणि अनुभव घेतले आहेत ते बघून, मला असे वाटते की बोर्डाच्या निवडुकीत लढणे हा प्रकल्पांच्या भविष्यासाठी आणि आपल्या मोहिमेस हातभार लावण्यासाठी सर्वात चांगला मार्ग आहे.
२. आपण बोर्डामध्ये कोणती कौशल्ये आणि/किंवा अनुभव आणता?
नियमितपणे सॉफ्टवेअरमध्ये काम करत असल्याने, मला खूप विश्लेषणात्मक आणि तपशीलावार असावे लागते. मी एक उपाय-शोधाभिमुख विचारवंत असल्याचा कल ठेवतो, आणि जेव्हा मी एखाद्या गोष्टीवर काम करण्यास प्रारंभ करतो तेव्हा मी ते सहज सोडत नाही. मला काल-मर्यादे सोबत काम करण्याची सवय आहे, व म्हणून मला थोडा वेळेचा दबाव असणे हे गैर वाटत नाही.
मी व्यवस्थापना मध्ये पण काम केले आहे, मी उन्हाळ्यातील नोकरी घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रभारी होतो, ज्याच्यात मला स्पष्टपणे संवाद साधण्याची आणि संयमाची आवश्यकता होती. शिवाय, मला माहीत आहे की चर्चांमध्ये योगदान देणे, इच्छुक असलेल्या सगळ्यांचे ऐकणे, आणि अनेक दृष्टिकोन विचारात घेऊन निर्णय घेणे किती महत्वपूर्ण आहे, जे मला वाटते वैविध्यपूर्ण लोक आणि मतांच्या गटासह कार्य करू पाहणार्या प्रत्येकासाठी आवश्यक आहे.
३. OTW साठी महत्वाची असलेली एक किंवा दोन ध्येय निवडा ज्यावर आपल्याला आपल्या सत्रात काम करण्यास आवडेल. आपल्याला ही ध्येय मोलाची का वाटतात? आपण इतरांसोबत काम करून ती पूर्ण कशी कराल?
OTWसाठी सर्वात महत्त्वाचे लक्ष्य म्हणजे अंतर्गत, आंतर-समिती सहयोग सुधारणे. सध्या जरी सर्व समित्या OTWच्या मोहिमेसाठी प्रयत्न करीत आहेत, तरीही त्यांना बहुतेक वेळा इतर संघांचे दैनंदिन काम किंवा त्यांच्या निर्णयांच्या विचारां-संदर्भात जास्त माहिती नसते—ही आवश्यक असलेली माहिती आहे जी गैरहजर राहिल्यास सहकार्याच्या मार्गामध्ये येऊ शकते. अंतर्गतदृष्ट्या काय अस्पष्ट आहे याचा बाहेर पण प्रभाव पडतो: आमच्या चर्चा आणि संरचना अव्यवस्थित झाल्यास आम्ही रासिकांना OTW बद्दल पुरेशी माहिती देऊ शकत नाही. सर्वांना एकाच पृष्ठावर आणणे कठीण आहे जेव्हा पृष्ठ काय म्हणते यावर आम्ही क्वचितच सहमत असू—हे रसिकांसह सामायिक करण तर दूर ची गोष्ट. म्हणून, मी समितीवर माझा वेळ मंडळामधील सहकार्य वाढविण्यासाठी वापरण्याचा प्रयत्न करेन. माझ्या मते, हे एकमेकांचे कार्यप्रवाह स्पष्टपणे समजून घेऊन आणि विविध गटांमध्ये अधिक संप्रेषणाच्या ओळी स्थापित करून प्राप्त करणे शक्य होईल.
रसिकांच्या समस्यांना प्रतिसाद देताना हे आम्हाला अधिक कार्यक्षम होण्यास देखील अनुमती देईल. अधिक सुचित आणि एकात्मिक स्वयंसेवक संघटना असेल तर एखाद्या गुंतागुंतीच्या समस्येवरील सर्व संभाव्य मुद्द्यांचा योग्यपणे विचार न केल्यामुळे होणारे गैरसमज आणि इतर गैरसोयी टाळण्या जाऊन आम्ही जलदपणे आणि अधिक व्यावसायिक पद्धतीने संभाव्य मुद्द्यांशी झुंजण्यात अधिक सक्षम बनू शकतो. अशाप्रकारे, आम्ही मोठ्या प्रमाणात रसिकगटांसह कसे संवाद साधतो याबद्दल आपण अधिक सक्षम होऊ, ज्यामुळे आम्हाला आपले कार्य आणि मर्यादा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येईल.
४. OTW च्या प्रकल्पांसंदर्भात आपला अनुभव कसा होता आणि संदर्भित समित्यांसोबत सहयोगाने कार्य करून आपण त्यांना सहाय्य आणि बळकट कसे कराल? विविध प्रकल्प सामिल करण्याचा प्रयत्न करा, पण आपल्याला ज्यांसोबत अनुभव आहे त्या विशेष प्रकल्पांवर मुक्तपणे भर द्या.
बर्याच लोकांप्रमाणेच, आपला सर्वात मोठा प्रकल्प AO3सह, मला अधिक अनुभव आहे. मी मूळ-रहिवासी इंग्रजी वक्ता नाही, व मी आशा करतो की आपण उपलब्धता, आखणी आणि तंत्रज्ञान समिती आणि भाषांतर समितीसह एकत्र काम करून एकाधिक भाषांमध्ये इंटरफेस उपलब्ध करू शकतो. बोर्डाचा सदस्य या नात्याने, मी इंटरफेसचे भाषांतर आणि साइटवरील इतर सुधारणा यासारख्या गोष्टींवर कार्य करण्यासाठी कोडिंगमध्ये ठेकेदारांच्या मदतीची आपली क्षमता वाढविणे आणि त्यांची बळकटी वाढविणे आणि ती पार्श्वभूमी कार्ये जी साइटला दररोज चालविते याकरीता आमच्या विकास-कार्यसंघासह कार्य करू इच्छित आहे.
मी पूर्वीच्या Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प) सह एकत्रितपणे त्यांच्या आयात घोषणांचे भाषांतर केले आहे. माझ्या दृष्टीने अन्यथा कायमचे गमावले जाणाऱ्या रसिकगट संग्रहाचे जतन करण्यासाठी रसिकमुक्तद्वार प्रकल्प ह्याचे काम खूप महत्वाचे आहे. जर मी बोर्डाचा सदस्य म्हणून निवडलो गेलो तर, मी हे करणे सुरू ठेवण्यास त्यांना सक्षम करू इच्छित आहे, आणि त्यासाठी त्यांना शक्य तितक्या चांगल्या परिस्थितीत त्यांचे कार्य करण्यासाठी साधने आणि संसाधने दिली जात आहेत हे सुनिश्चित मी करेन.
मला आपल्या इतर प्रकल्पांबद्दल वैयक्तिकरित्या कमी अनुभव आहे परंतु मी त्यांच्याबरोबर एकत्र काम करण्याची अपेक्षा करतो. ते सर्व आश्चर्यकारकपणे प्रभावी कार्य करतात. मी कायदेविषयक समितीच्या वकिलीच्या कामाचे खूप कौतुक करतो; त्यांच्याशिवाय रसिकगट एक वेगळी जागा असली असती. Transformative Works and Cultures – TWC (नोंदवही समिती) हे प्रशंसक अभ्यासकांसाठी सर्वात महत्वाचे प्रकाशने आहे आणि फॅनलोर हे आमच्या समुदायांकरिता अत्यंत महत्त्वाच्या इतिहासाची एकत्रित नोंद आहे आणि हे दररोज वाढत आहे हे पाहून मला आनंद होतो. मी निवडला गेलो तर मी त्यांच्या गरजा आणि बोर्डाच्या सदस्य या नात्याने हे कसे समर्थित करू शकतो याबद्दल अधिक जाणून घेण्याची आशा ठेवतो.
५. आपण आपले बोर्डाचे कार्य व OTW मधील इतर भुमिका यांचा समतोल कसा साधाल, किंवा बोर्डाच्या कामावर लक्ष केंद्रित करण्याकरीता आपण आपल्या सद्यकालीन भुमिका हस्तांतरीत कशा प्रकारे कराल?
भाषांतर समितीत माझे सध्याचे स्थान कायम ठेवण्याचा माझा मानस आहे. आमच्या अनुवादकांशी संपर्क साधण्याचा आणि OTW संघांच्या महत्त्वपूर्ण संख्येत सर्वकाही कसे चालले आहे याचा मागोवा ठेवण्याचा हा एक सुंदर मार्ग आहे. दोन्ही पदांचा समतोल राखणे समस्या ठरणार नाही, कारण भाषांतर समितीचे स्वयंसेवक व्यवस्थापक म्हणून वेळ व्यवस्थापन आपल्या स्वत: च्या हातात आहे: आम्ही आपले वेळापत्रक बनवितो, आमच्या वेळापत्रकानुसार वेगवेगळ्या प्रकारची कामे आम्ही घेत असतो. माझ्या अगोदरच्या इतरांनी एकाच वेळी या दोन भूमिका कोणत्याही समस्यांशिवाय व्यवस्थापित केल्या आहेत आणि मला विश्वास आहे की मी देखील ते करू शकीन. जर गोष्टी अती-व्यस्त झाल्या तर मी समितीच्या अध्यक्षांसमवेत विलंब घेण्याबाबत चर्चा करू शकतो.