इ. ॲना सेगेडी यांचे जीवनचरित्र व व्यासपीठ

जीवनचरित्र

इ. ॲना सेगेडी यांना रसिकगटाचा शोध बरीच वर्षे आधी लागला जेव्ह त्यांना या शब्दाचा अर्थ ही माहित नव्हता. त्यांनी त्यांची पहिली रसिककथा (हिरोज ॲाफ माइट अँड मॅजिक III साठी) पेंसिल ने प्रिंटर कागदावर वयाच्या आठव्या वर्षी लिहिली. ऑनलाईन रसिकगटातील त्यांचा पहिला उपक्रम एका छोट्या मंचाद्वारे होता जो जोनाथन स्ट्राउड च्या बार्टीमियस ट्रिलॉजि ला समर्पित होता, जिथे त्यांनी आपली पहिली अनेक-अध्याय रसिककथा प्रकाशित केली. इंग्रजी मंच व रसिक-साईट शोधल्यामुळे त्यांना इंग्रजी शिकण्याचे प्रोत्साहन मिळाले, आणि इंग्रजीत रसिक कार्य वाचल्याने (आणि लिहिल्याने) त्यांचे भाषांसंदर्भातील प्रेम प्रफुल्लित झाले.

त्या २०१७ मध्ये OTW (परिवर्तनात्मक रसिककला मंडळी) ला भाषांतर समिती सदस्य म्हणून सामील झाल्या. Archive of Our Own – AO3 (आममचा स्वतःचा संग्रह) च्या उत्सुक वापरकर्त्या असल्यामुळे, जे इंग्रजी बोलत नाहीत त्यांच्यासाठी OTW च्या प्रकल्पांना आणखी सुलभ करण्यास ॲना उत्सुक होत्या. नंतर, त्या समितीसाठी स्वयंसेवक व्यवस्थापक झाल्या, भाषांतर स्वयंसेवकांना त्यांच्या कार्यांसाठी प्रशिक्षण व समर्थन असे कार्य करू लागल्या.

ॲना जवळ इंग्रजी व अमेरिकन फिलोसोफी मधील बॅचलर्स आणि भाषांतर व इंटरप्रिटेशनमध्ये मास्टर्स डिग्री आहे. त्या एका विद्यापीठात प्रशासन विभागात कार्यरत आहेत, आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा प्रवेश आणि दैनंदिन आधार याची जबाबदारी सांभाळतात.

व्यासपीठ

1. आपण बोर्डाच्या निवडणुकीत सहभागी होणे का ठरविले?

ज्या दिवसापासून मी पुस्तके हाताळण्याएवढी नीट वाचायला शिकले त्या दिवसापासून, रसिकगटाने माझ्या आयुष्यात खूप महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे. जगातील अनेक लोकांप्रमाणे, जेव्हा खऱ्या आयुष्यातून थोड्या काळासाठी दूर व्हायचे असते तेव्हा माझ्यासाठीही ते आधार व सुटकेचे साधन आहे. माझा विश्वास आहे की OTW जे कार्य करते ते रसिकगटांसाठी अत्यंत महत्वाचे आहे, आणि जरी भाषांतर समितीबरोबर माझा वेळ पुरस्कृत असला, तरी आता मी अश्या स्थितीत आहे जिथे मी समुदायास योगदान अधिक चांगल्या पद्धतीने करू शकीन. सर्व अप्रतिम निर्मात्यांना ज्यांनी मला अवघड काळात पुढे जाण्यास समर्थन दिले त्यांना मला परत-फेड करावयाची आहे. आणि ते करण्यासाठी उत्तम मार्ग हा OTW बोर्डावर कार्य करणे आहे, असे मला वाटते.

2. आपण बोर्डामध्ये कोणती कौशल्ये आणि/किंवा अनुभव आणता?

विद्यापिठातील प्रशासन विभागातील कामामुळे जिथे अर्धे विद्यार्थीगण आंतरराष्ट्रीय असतात, मला रोजच्यारोज विस्तृत सामाजिक आणि सांस्कृतिक पल्ल्यातील किशोर-वयीन मुलांबरोबर आणि युवकांबरोबर काम करण्याची संधी मिळते. मी त्यांना सर्व प्रकारच्या बाबी हाताळण्यास मदत करते- परदेशातून स्थलांतर आणि त्यांच्या राहण्याच्या सोयी पासून ते प्रयोगांची तिकिटे विकत घेऊन देणे आणि अधिकृत पत्रं भाषांतरित करणे. माझ्या नोकरीमध्ये, अधिकतम बहुसांस्कृतिक वातावरणात वावरण्यासाठी मला सहानुभूती आणि समजूतदारपणा गरजेचा असतो, जो मला आंतरराष्ट्रीय संस्थेच्या बोर्डावर मदतीस येईल. मला असे वाटते की माझ्या भाषांतर स्वयंसेवक तसेच नंतर व्यवस्थापक स्वयंसेवक म्हणून OTW मधल्या काळाने, मला महत्वाची संभाषण व व्यवस्थापन कौशल्य शिकवली आहेत. माझे छोट्या तपशिलांवर चांगले प्रभुत्व आहे, आणि ह्या कौशल्याने मला इथे OTW मध्ये तसेच खऱ्या आयुष्यातही खूप मदत केली आहे.

३. OTW साठी महत्वाची असलेली एक किंवा दोन ध्येय निवडा ज्यावर आपल्याला आपल्या सत्रात काम करण्यास आवडेल. आपल्याला ही ध्येय मोलाची का वाटतात? आपण इतरांसोबत काम करून ती पूर्ण कशी कराल?

OTW चे प्रकल्प शक्य तेवढ्या अधिक भाषांमध्ये उपलब्ध करून देणे ह्या ध्येयाशी मी सर्वात जुडलेली आहे. मला अजूनही लक्षात आहे की किशोर-वयात किती कष्टाने मी सेलर मून विकी पृष्ठ माझ्या साठी भाषांतरित केलं होतं, कारण माझ्या भाषेत खूप कमी मजकूर उपलब्ध होता. माझी इच्छा आहे की मी OTW च्या प्रकल्पांचा वापर करण्यासाठी व त्यामध्ये सहज सामील होण्यासाठी अश्या लोकांना मदत करू शकीन जे इंग्रजी मध्ये अस्खलित नाहीत. त्याचबरोबर आपले प्रकल्प अश्या लोकांनाही उपलब्ध असणे मला महत्वाचे वाटते ज्यांना दृष्टिदोष आहे किंवा इतर कुठलेही दिव्यांगत्व आहे ज्यामुळे त्यांच्या ऑनलाईन अनुभवांवर परिणाम होतो. उदाहरणार्थ, चित्रांवर मथळे लिहिल्याने जे लोक स्क्रीन वाचक वापरत आहेत त्यांना मदत होते; हा अगदी छोटा तपशील आहे, पण अत्यंत महत्वाचा आहे.

रसिककृतीचे जतन हा OTW च्या कामाचा आणखी एक मोठा पैलू आहे. बार्टीमियस ट्रिलॉजि मंच जिथे मी माझी पहिली रसिककृती प्रदर्शित केली ती आता ऑनलाईन नाही, ज्याचा अर्थ असा कि जी कार्य तिकडे जतन केली गेली होती ती आता गमावली गेली आहेत. अश्या मंचांना AO3 मध्ये आयात करण्याचा मार्ग उपलब्ध करून देण्याने रसिकगटाचा एक छोटा भाग जिवंत राहू शकतो, ज्या लोकांनी ते मूळ व्यासपीठ बनविले ते पुढे निघून गेले असतील तरीही.

४. OTW च्या प्रकल्पांसंदर्भात आपला अनुभव कसा होता आणि संदर्भित समित्यांसोबत सहयोगाने कार्य करून आपण त्यांना सहाय्य आणि बळकट कसे कराल? विविध प्रकल्प सामिल करण्याचा प्रयत्न करा, पण आपल्याला ज्यांसोबत अनुभव आहे त्या विशेष प्रकल्पांवर मुक्तपणे भर द्या.

भाषांतरामुळे मला अनेक प्रकारे इतर प्रकल्पांवर सहयोगाने काम करण्याची संधी मिळाली. मी AO3 च्या टाचणखुणा टाचणखुण समिती व नियम व तक्रारनिवारण समिती च्या इंग्रजी मध्ये अस्खलित नसणाऱ्या वापरकर्त्यांशी संपर्कासाठी भाषांतरित केल्या आहेत. मला कल्पना आहे की AO3 इंटरफेस इंग्रजी सोडून इतर भाषांसाठी उपलब्ध करणे ही पायरी आपण अत्ता चढू शकत नाही, पण मधल्या काळात, आपण इंग्रजी-एतर भाषिकांचे जगणे सोपे करू शकतो.

बोर्ड सदस्यांच्या नात्याने, मी सर्व समित्यांच्या गरज जाणून घेऊ इच्छिते ज्यामुळे मी त्यांना माझ्या क्षमतेच्या उत्तम स्तराचा आधार देऊ शकीन. माझा विश्वास आहे की आपले शिक्षण कधीच थांबत नाही, आणि मी ह्या संधींद्वारे माझ्या स्वतःची कौशल्ये आणि माझे नवीन ज्ञान इतरांसाठी वापरणे हे दोन्ही करू इच्छिते.

५. आपण आपले बोर्डाचे कार्य व OTW मधील इतर भुमिका यांचा समतोल कसा साधाल, किंवा बोर्डाच्या कामावर लक्ष केंद्रित करण्याकरीता आपण आपल्या सद्यकालीन भुमिका हस्तांतरीत कशा प्रकारे कराल?

सध्यस्थितीत, माझी OTW मधील भूमिका ही स्वयंसेवक भाषांतर व्यवस्थापक आहे, आणि मला की जेवढा मोकळा वेळ मला मिळतो तेवढा अजून एका भूमिकेसाठी पुरेसा आहे. कृपाकरुन, माझ्या दिवसाचे काम लवचिक आहे की मी OTW च्या कर्तव्यास वेळ देऊ शकीन. मी बहुतकरून निशाचर असल्यामुळे, मला रस असलेल्या गोष्टींसाठी उशिरापर्यंत काम करणे मला जड नाही. आणि OTW अगदी तसेच आहे- ज्याबद्दल मला खूप आपुलकी आहे, ज्यासाठी प्रत्येक मिनिट घालवणे हे मोलाचे आहे.